टिटवी येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्ताने पालखीची मिरवणूक

Khozmaster
2 Min Read

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

सोयगाव तालुक्यातील टिटवी येथे परब्रम्ह परमेश्वर अवतार भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्मोत्सव सोहळा निमित्ताने सात दिवस श्रीकृष्ण मुतीॅचा विशेष ठेवून स्थापना केली होती.आणि सात दिवस चालणारे धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते श्रीकृष्ण गोकुळाष्टमीनिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही बुधवारी मध्यरात्री कृष्णजन्माष्टमी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. कृष्ण जन्मानंतर शेकडो उपस्थित भाविकांनी कृष्ण भगवान की जय हो, राधे-कृष्णा गोपाळ-कृष्णा जयघोष करत दर्शनाचा लाभ घेतला.आणि शेवटच्या दिवशी फुलांनी सजविलेल्या पाळण्यात श्रीकृष्णाची मूर्ती ठेवण्यात येऊन जन्म साजरा करण्यात आला. त्यानंतर फटाके फोडून मुरमुरे,पेढे वाटप करण्यात आले.श्री कृष्णजन्माष्टमीनिमित्ताने बुधवारी सायंकाळी सवाद्य पालखी, ढोलताशे, लेझीम पथकाच्या गजरात श्रीकृष्णाच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. फुलांनी सजवलेल्या पालखीत कृष्णाची मूर्ती ठेवण्यात आली होती. मिरवणुकीत शेकडो भाविक भक्तांनी व महिलांनी वेषभूषा परिधान करून व पेठे बांधून सहभागी झाले होते.गावात पूर्ण चौक सजविण्यात आले होते महिलांनी तर श्रीकृष्णाच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती.श्रीकृष्ण नाम घोषनाने टिटवी नगरी दुमदुमून गेली होती.याप्रसंगी अखिल भारतीय पंचकृष्ण परिषदचे अध्यक्ष प.पु.मं.आचार्य श्री लोणारकर बाबा महानुभाव गोपाळ आश्रम बुलढाणा टिटवी सारख्या छोट्या गावात येऊन उपदेशी मंडळी व ग्रामस्थ यांना श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा निमित्ताने मार्गदर्शन केले.

अखिल भारतीय पंचकृष्ण युवक मंडळाचे यांच्या वतीने कार्यक्रमाचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. १२ ते ३ महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. यावेळी शेकडो भाविकांनी लाभ घेतला, तर गुरुवारी सकाळी ८ वाजता ध्वजारोहण सरपंच भागवत जाधव, पोलिस पाटील ज्ञानेश्वर राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प पु मं आचार्य लोणारकर बाबा महानुभाव बुलढाणा, सरपंच भागवत जाधव, मुख्याध्यापक अरुण गवळी, ज्ञानेश्वर मख सर, उपसरपंच लहू प्रेमसिंग राठोड, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील ज्ञानेश्वर राठोड, तंटामुक्ती अध्यक्ष, प्रमोद पाटील, ताराचंद राठोड, मुरलीधर गौलखेडे, समाधान सपकाळ,कडुबा जाधव,मारोती लवंगे, श्रावण चंडोल, विनोद जाधव, उपदेशी मंडळी,सावळदबारा येथील अखिल भारतीय पंचकृष्ण युवक मंडळाचे पदाधिकारी, पुजारी मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

0 9 4 7 0 4
Users Today : 54
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *