गावठी हात भट्टीची दारु बनविणाऱ्यांविरुध्द् नंदुरबार जिल्हा पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त कारवाई,

Khozmaster
3 Min Read

नंदुरबार -: खोजमास्टर प्रतिनिधी प्रविण चव्हाण     5 लाख 21 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. आगामी सण, उत्सवाच्या अनुषंगाने समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर अंकुश राहावा व आगामी येणारे सण उत्सव भयमुक्त वातावरणात पार पाडावेत यासाठी खबरदारी म्हणून नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यात गावठी हात भट्टीची दारु निर्मिती करणारे, देशी विदेशी दारुची चोरटी वाहतुक तसेच विदेशी दारु बनविण्यासाठी उपयोगी पडणारे स्पिरीट ची वाहतूक करणाऱ्यांविरुध्द् विशेष मोहिम राबवून कारवाई करणे बाबत सुचना सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या.त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात दिनांक 05 सप्टेंबर 2023 रोजी पासून विशेष मोहिमेची सुरुवात झालेले आहे.    या दरम्यान दिनांक 09 सप्टेंबर 2023 रोजी गावठी हातभभट्टी तयार करणारे इसम व त्यांची जागा या बाबत गोपनीय माहिती काढण्यात आली.    त्यानंतर जिल्हा पोलीस दलातील सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार, स्थानिक गुन्हे शाखेचे व राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी व अंमलदार यांनी एकाच वेळी अशा ठिकाणी छापा टाकून कारवाई करणे बाबत नियोजन करण्यात आले होते. दिनांक 09 सप्टेंबर 2023 रोजी पहाटेच्या सुमारास सर्व पोलीस ठाण्याचे, स्थानिक गुन्हे शाखेचे व राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी व अंमलदार यांनी जिल्ह्यातील टेक भिलाटी परिसरात, प्रकाशा, दुधखेडा, चिरखान, मानमोड्या, गोगापूर, भोंगरा, फत्तेपूर, राणीपूर, सुलवाडे, बोरपाडा, तारपाडा, चिंचपाडा, बिलमांजरे, भवर, उमर्टी, सारंगखेडा इत्यादी ठिकाणी एकाच वेळी 42 छापे टाकून गावठी हात भट्टीची दारु तयार करण्यासाठी लावण्यात आलेल्या भट्टया उध्द्वस्त केल्या. त्यात 1 लाख 85 हजार 540 रुपये किमंतीचे 5,180 लिटर गावठी हात भट्टीची दारु तयार करण्यासाठी उपयोगी पडणारा महू फुलांचा सडका वॉश, 1 लाख 95 हजार 600/- रुपये किमतीची 4,897 लिटरगावठी हात भट्टीची दारु, 94 हजार 400 रुपये किमतीचे साहित्य तसेच 45 हजार 900 रुपये किमतीचे विदेशी दारु बनविण्यासाठी उपयोगी पडणारे 35 ली. स्पिरीट असा एकूण 5 लाख 21 हजार 440/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच गावठी हातभट्टीची दारु व दारु निर्मीत करणे कामी उपयोगी पडणारा महु फुलांचा सडका वॉश व साहित्य व विदेशी दारु बनविण्यासाठी उपयोगी पडणारे स्पिरीटची वाहतूक करणारे 42 इसमांविरुध्द् संबंधीत पोलीस ठाण्यांना एकूण 42 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडुन गुन्हेगारांवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलेल्या कारवाईमुळे हातभट्टीची दारु निर्मित व वाहतुक करणाऱ्यांवर कायद्याचा धाक निर्माण झालेला असुन नागरिकांनी,   याबाबत समाधान व्यक्त करुन नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे कौतुक केले आहे.   ही कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक स्नेहा सराफ यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, शहादा उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, अक्कलकुवा उप विभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांचेसह सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व अंमलदार यांच्या पथकांनी केलेली असुन पुढील काळात देखील हातभट्टीची दारु निर्मित करणारे व देशी विदेशी दारुची चोरटी विक्री व वाहतुक करणाऱ्यांविरुध्द् अशीच प्रभावीपणे मोहीम राबविण्यात येईल,   असे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले.

0 9 4 7 0 4
Users Today : 54
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *