नागपुरातील बडे बुकी व डामयंड एक्स्चेंजचा सूत्रधार राकेश राजकोट ऊर्फ आरआरही आला. तब्बल दोन दिवस ते गोंदियात तळ ठोकून होते. यानंतर त्याने छोट्या बुकींसाठी आमगावर मार्गावरील एका लॉनमध्ये पार्टी आयोजित केली होती.डायमंड एक्स्चेंज डॉट कॉम ही जुगार साइट यशस्वी झाल्यामुळे बुकी सोंटू ऊर्फ अनंत जैन (रा. गोंदिया) याने गोंदिया आणि नागपुरात पार्टी दिली होती. या पार्टीत कुख्यात दाऊद टोळीचे सदस्यांनीही हजेरी लावली होती, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डायमंड एक्स्चेंज सुरू केल्यानंतर त्याने अनेक व्यापाऱ्यांना कोट्यवधीचा चुना लावला. हा व्यापार यशस्वी ठरल्याने सोंटूने २०१८मध्ये गोंदियातील दोन ठिकाणी पार्टी दिली. बालाघाट मार्गावरील एका लॉनमध्ये झालेल्या पार्टीत दाऊद टोळीचे सदस्य व नईमचे खास म्होरके आले. याशिवाय, नागपुरातील बडे बुकी व डामयंड एक्स्चेंजचा सूत्रधार राकेश राजकोट ऊर्फ आरआरही आला. तब्बल दोन दिवस ते गोंदियात तळ ठोकून होते. यानंतर त्याने छोट्या बुकींसाठी आमगावर मार्गावरील एका लॉनमध्ये पार्टी आयोजित केली होतीगोंदियातील पार्टीनंतर त्याने नागपुरातील एका फार्महाउसवरही डी टोळी व आरआरच्या खास म्होरक्यांना पार्टी दिली होती. सोंटू हा गुन्हेशाखेच्या पोलीस कोठडीत आहे. त्याला सर्वाधिक काळ कोठडीतच ठेवण्यात येत असल्याची चर्चा नागपुरात सुरू झाली. ही चर्चा वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्याने या प्रकरणातील अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. तपासात हलगर्जीपणा करू नका अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल,असा इशारा दिल्याचे समजते.