आज दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी मंगळवारी
पोलीस स्टेशन बार्शीटाकळी येथे नवदुर्गा विसर्जन धम्मचक्र प्रवर्तन दिन मिरवणूक संदर्भात शांतता समिती सभा चे आयोजन करण्यात आले होते या वेळी आयोजित सभेत बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांनी उपस्थित शांतता समिती सदस्यांना मार्गदर्शन केले येणारे सण उत्सव शांततेत साजर करण्याचे आवाहन या वेळी त्यांनी केले कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी व सदर सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्व शांतता समिती सदस्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले,या वेळी सदर सभेत माजी सरपंच मासुम खान सय्यद रियासत भोला इनामदार माहेफुज उल्लाह खान रमेश वाटमारे प्रभाकर चव्हाण हाजी सादिकूज जमा पुष्पाताई रत्नपारखी सैय्यद फारूक अतिक उल्लाह इनामदार भारत बोबडे व सर्व शांतता समिती सदस्य व सर्व पत्रकार बांधव यांची उपस्थिती होती या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत केदारे यांनी तर आभार प्रदर्शन गोपनीय विभाग प्रमुख किशोर पिंजरकर यांनी केले