बुलढाणा, दि. २९ (प्रतिनिधी)
जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही राम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. भव्य शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक धार्मिक उपक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. या प्रसंगी विविध राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवला. 🙏✨
🛕 श्रीराम मारुती मंदिर संस्थान, बुलढाणा
श्रीराम मारुती मंदिर परिसरात सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. “राम जन्मला ग सखे, राम जन्मला” तसेच “श्रीराम जय राम जय जय राम” या पारंपरिक गजरांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला.
गुढीपाडवा ते हनुमान जयंती या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्रीरामरायांना अभिषेक, मातृवर्गाची भजनसेवा, दैनिक व साप्ताहिक उपासना तसेच क्षेत्र औदुंबर येथील वरदबुवा जोशी, शरद गुरव आणि राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे कीर्तन पार पडले.
या प्रसंगी श्रीराम मारुती मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. प्रमोद देशपांडे, बुलढाणा अर्बन सहकारी पतसंस्था चे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, उपाध्यक्ष मधुसूदन कुलकर्णी आणि अनंता देशपांडे यांच्या हस्ते श्रीरामाची आरती करण्यात आली.
Users Today : 5