प्रतिनिधी रामेश्वर वाढी
पातुर तालुक्यातील हिंगणा येथील वैष्णवी नवदुर्गा उत्सव मंडळ यांचे वतीने 20 ऑक्टोंबर 2023 रोजी “येऊन बसा आणि खदखद हसा”या हिम्मतराव ढाळे यांच्या भन्नाट शोचे आयोजन कवी संमेलन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक वसंतराव उजाडे होते तर अंकुर साहित्य संघाचे संघाचे केंद्रीय अध्यक्ष हिम्मतराव ढाळे, प्रसिद्ध कवी गायक, गजानन छबिले, वऱ्हाडी कवी प्रशांत भोंडे, कवि सुनिल लव्हाळे, अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय संघटक देवानंद गहिले , अंकुर साहित्य संघाचे अकोला जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णरावजी घाडगे,
अंकुर साहित्य संघाचे पातुर तालुका अध्यक्ष नारायण रावजी अंधारे, अंकुर साहित्य संघाचे पातुर तालुका सचिव प्राध्यापक विठोबा गवई, सुप्रसिद्ध गायक कलावंत
प्रा. करुणा गवई, आदी मान्यवरांची उपस्थिती होती
यावेळी उपस्थित अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष हिम्मतराव ढाळे यांनी आपल्या भन्नाट धमाकेदार विनोद सादर करून रसिकांना हसायला भाग पडले
यासोबतच उपस्थित सर्व मान्यवर कवींनी आपल्या अतिशय दर्जेदार कविता सादर करून रसिक गावकऱ्यांना अगदी मंत्रमुग्ध केले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिम्मतराव ढाळे यांनी केले तर प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन सुपडाजी उजाडे यांनी केले
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश उजाडे, निलेश उजाडे, मधुकर उजाडे,, दत्तात्रय उजाडे, मंगेश मालवटे, शुभम उजाडे, सुपडाजी उजाडे, गणेश इंगळे ,पवन उजाडे, आनंद उजाडे, चेतन उजाडे, पुरुषोत्तम इंगळे, नागेश्वर काळे, वसंतराव उजाडे, आनंदराव उजाडे, निरंजन उजाडे,नारायण कारस्कर, विजय उजाडे, महादेवराव उजाडे आणि वैष्णवी नवदुर्गा उत्सव मंडळ हिंगणा आणि ग्रामस्थ यांनी अथक प्रयत्न केलेत