सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरात सोयाबीन सोंगणीला व काढणीला सुरुवात झाली आहे मात्र सोयाबीनला भाव नसल्याने अगोदरची सोयाबीन घरातच पडून आहे तिला घराच ठेवल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात घट आली आहे.यंदा जुन महिन्यात पाऊस कमी झाल्याने सोयाबीन ची पेरणी करतात आली नाही जुन च्चा शेवटच्या टप्प्यात व जुलै महिन्यात पेरणी करावी लागली
नांदा तांडा, देव्हारी, टिटवी, पळसखेडा, मोलखेडा, घाणेगांव तांडा, पिंपळवाडी, चारुतांडा, घाणेगाव तांडा,डाभा, मोलखेडा, जामठी, सावळदबारा सह सर्व परिसरात सोयाबीन कापणीला सुरुवात झाली आहे सोयाबीन हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे पीक आहे सोयाबीन चे भाव निम्म्यावर तर सोंगनीचे दर मात्र दुपटीने वाढले आहे यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे या वर्षी सावळदबारा, टिटवी, पळासखेड,व सर्व सोयगाव तालुक्यात सोयाबीन पिकाची जास्त प्रमाणात पेरणी केली आणि पिकेही बहरली पण ऑक्टोंबर महिन्यात सोगनीच्चा तोंडावर निसर्गाचा लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला सप्टेंबर महिन्यात जास्त प्रमाणात पाऊस अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन शेतकरी भरपूर प्रमाणात नुकसान झाले अशातच दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीनचे पीकानवर येलो मौजेक या रोगाच्चा प्रादुर्भाव मुळे सोयाबीन पीक हातचे गेल्याचे चित्र निर्माण झाले सोयाबीन सोगनीकरता पळासखेड टिटवी, सावळदबारा, देव्हारी, इत्यादी खेड्यातील शेतमजूर बारा पंधरा चा समुह करून 3500 रु एकर दराने सोगनीला घेऊन शेत सोगनी पुर्ण करता सोयाबीन चे सध्याला भाव 4500 रु क्विंटल दर असुन हा दर अपेक्षित नसल्याने शेतकरी नाराज झाले आहेत दर असमाधानकारक असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणूकीवर भर दिला आहे सोयाबीन चे दर वाढतील ही अपेक्षा शेतकऱ्यांची सरकारकडे केली आहे
Users Today : 47