प्रथमेश ने केला खेडे गावासाठी एक नवा आदर्श तयार .
सतीश पाटील तेजनकर
लोणार :-
लोणार तालुक्यातील वडगाव तेजन गावातील सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या खेड्यातील शाळेत शिकून प्रथमेश प्रदीप तेजनकर या मुलाने नीट परीक्षेत 629 मार्क मिळवून खेड्यातील विद्यार्थ्यांसाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
वडगाव तेजन गावातील माजी पंचायत समिती सदस्य के.के.तेजनकर यांचा नातू प्रथमेश प्रदीप तेजनकर या विद्यार्थ्याने खेडेगावातील शाळेमध्ये शिक्षण घेऊन नीट परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात 629 मार्क मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.व त्या यशाचे कौतुक होऊन गावातील सर्वच मुलांनी त्याचा आदर्श घ्यावा या उद्देशाने वडगाव तेजण गावातील सर्व गावकऱ्यांनी मिळून प्रथमेश चा भव्य नागरिक सत्कार आज दिनांक 02 ऑक्टोंबर 2022 रोजी करण्यात आला.
यावेळी प्रथमेशने व त्याच्या वडिलांनी गावातील उपस्थित नागरिकांना व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून स्पर्धेच्या युगात रात्रंदिवस अभ्यास केल्याशिवाय व मोबाईल पासून लांब राहिल्याशिवाय शिक्षण होणार नसल्याचे उपस्थितांना पटवून दिले.
झालेल्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी वडगाव तेजण गावातील सर्व क्षेत्रातील फार मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
Users Today : 22