पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती एलपीजी (LPG) ग्राहकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास ग्राहकांना मिळणारी गॅस सबसिडी बंद होऊ शकते, तसेच गॅस कनेक्शन निलंबित होण्याची शक्यता आहे.
मात्र, ग्राहक आता गॅस एजन्सीच्या रांगेत उभे राहण्याची गरज नाही. ही पडताळणी मोबाईलवरून मोफत पूर्ण करता येईल.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार, सबसिडी योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास ग्राहकांना दरमहा ३००–४०० रुपयांचा सबसिडी लाभ गमवावा लागू शकतो. तसेच, नवीन सिलिंडर बुक करताना अडचणी येऊ शकतात किंवा डिलिव्हरी रद्द होऊ शकते.
सुरक्षिततेसाठी आणि सबसिडीचा लाभ टिकवण्यासाठी तात्काळ ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.
Users Today : 14