छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सिल्लोड विभागातील सिल्लोड उपविभाग १ सिल्लोड उपविभाग २ आणि सोयगाव उपविभागातील महावितरण मधील तांत्रिक कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी त्यांचे क्रमबद्ध आंदोलन चालू केले आहे. महाराष्ट्रातील तांत्रिक कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र लाईन स्टाफ बचाव कृती समिती गठीत करण्यात आलेली आहे त्या समितीला पाठिंबा देण्यासाठी सिल्लोड सोयगाव तालुक्यातील सर्वच तांत्रिक कर्मचारी यांनी या आंदोलनामध्ये हिरारीने सहभाग नोंदवलेला आहे. सदरील तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत, तांत्रिक कर्मचाऱ्यांचे वर्ग 4 मधून वर्ग उमध्ये समायोजन करण्यात यावे, प्रत्येक लाईनमन यांना वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ग्राहकांना अखंडित वीज पुरवण्यासाठी महावितरण तर्फेएका महिन्यासाठी पाच लिटर पेट्रोल एवढा पेट्रोल भत्ता दिला जातो तो वीस लिटर मिळावा, लाईनमन यांना स्वतंत्र वेतनश्रेणी देण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्रातील सर्व लाईनमन ३० ऑक्टोंबर पासून आंदोलनात सहभागी आहे. आंदोलनातील प्रमुख टप्पे पुढील प्रमाणे आहेत, ३०/११/२०२३पासून लाईनमन यांना महावितरण ने लोकाभिमुख सेवा देण्यात यावी यासाठी जे सिम कार्ड
वापरण्यास दिले होते ते सर्व लाईनमन बांधवांनी कँपनीस वापस दिले आहे, ६/११/२०२३ पासून कोणतीही वीज बिल वसुली करायची नाही, १६/११/२०२३ पासून ग्राहकांना सेवा देण्यासाठी स्वतःच्या वाहनाचा वापर बंद करण्यात यावा. २८/११/ २०२३पासून असहकार काम बंद आंदोलन पुकारण्यात येणार आहे, २/११/२०२३ रोजी
एक दिवशी धरणे आंदोलन मुंबई येथील आझाद मैदानावर करण्यात येणार आहे., ११/१२/२०२३ पासून मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत आमरण उपोषण महाराष्ट्रातील सर्व लाइनमन तर्फेमुंबई येथील आझाद मैदानावर करण्यात येणार आहे अशी माहिती सोयगाव येथील तांत्रिक कर्मचाऱ्यांनी दिली आहे परंतु ह्या मागण्यासाठी ग्राहकास अखंडीत सेवा देण्याचे कार्यही तत्परतेने करणार असल्याची कबुली यावेळी कर्मचाऱ्यांनी दिली.
Users Today : 47