वैजापूरच्या आनंद ग्रुप ऑफ हॉस्पिटलमध्ये सेवारत व सेवा निवृत्त सैनिक व कुटुंबियांना मोफत वैद्यकीय सुविधा मिळणार!

Khozmaster
2 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर ता,२१
आयुष्यमान भारत कार्ड धारक सेवारत व सेवानिवृत्त
बी,एस, एफ,जवान, तसेच सी,आर,पी,एफ जवान व त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय सेवा विनाशुल्क देण्यासाठी आनंद ग्रुप हॉस्पिटल कटिबद्ध आहे असे या रुग्णालयाचे प्रमुख डॉ,अमोल अन्नदाते यांनी मंगळवार(ता,२१)रोजी  प्रतिपादित केले,ऑल इंडिया
सेंट्रल एक्स पॅरामिलिटरी वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र चे सचिव गौतम गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी डॉ,अन्नदाते याना  आयुष्यमान कार्ड धारक सेवारत  आणिसेवानिवृत्त जवानांना  वैद्यकीय सेवा विनाशुल्क द्यावी असे निवेदन सोपविले त्या प्रसंगी ते बोलत होते, ते पुढे म्हणले की,जे जवान सीमेचे रक्षण करीत आहेत किंवा ज्यांनी केलेले आहे त्यांच्या साठी आनंद हॉस्पिटल ची दारे सदैव उघडी आहेत, राजपूत व गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन केले या प्रसंगी त्यांचे बंधू डॉ,अभिजित अन्नदाते व सहाय्यक सुवर्णा बोर्डे  ही उपस्थित होते,या साठी सेवारत  व सेवानिवृत्त सैनिकांनी आपली व कुटुंबियांची नोंद या रुग्णालयात  श्रीमती सुवर्णा बोर्डे कडे करणे  आवश्यक आहे,आवश्यक कागद पत्रे दाखल करून  ही नोंद केल्यानंतर वैद्यकीय सुविधा  निशुल्क मिळतील या साठी गौतम गायकवाड यांच्याकडे ही संपर्क साधावा व मार्गदर्शन घ्यावे असे आवाहन ही करण्यात आले आहे,या प्रसंगी बी,एस, एफ चे सेवानिवृत्त जवान व उपाध्यक्ष सोपान गाढे,सीआरपीएफ चे नितीन त्रिभुवन, विष्णू मोईन, ,संजय काळे,तुकाराम गायकवाड,व बी एस, एफ चे
दत्तू निकम,तुषार गायकवाड यांची उपस्थिती होती,
(फोटो कॅप्शन-डॉ,अमोल अन्नदाते व डॉ,अभिजित अन्नदाते यांना निवेदन देऊन त्याची निवड व्ही,पी,कॉलेज वर झाल्या बदल सत्कार करताना
0 9 4 6 9 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *