सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील वरखेडी तांडा गावातील जलजीवन मिशन योजने अंतर्गत १ कोटी ४३ लक्ष रुपय किमतीची नवीन पाणीपुरवठा योजना मा.ना.अब्दूलजी सत्तार साहेब अल्पसंख्याक व पणन कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून व मा.गोपीचंद गबरु जाधव जिल्हा परिषद सदस्य फर्दापूर गट यांच्या विशेष प्रयत्नातुन मंजूर करण्यात आली असून दि. २२ नोव्हेंबर शुक्रवार रोजी मा.श्री. गोपीभाऊ जाधव जि.प.सदस्य व सरपंच पती विनोद सुदाम जाधव व तसेच समस्त गावकरी मंडळी च्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, यावेळी मा.प.समिती सदस्य मगन जाधव, ग्रा.प.उपसरपंच उमर पठाण, रो. सेवक श्रावण जाधव, ग्रा.प.सदस्य बळीराम जाधव, शेषमल जाधव,आरिफ पठाण, इरफान पठाण, धारा राठोड, अमर राठोड, राणीदास राठोड, उपस्थित गावातील प्रतिष्ठित नागरिक म्हणून सोना चव्हाण, भावसिंग चव्हाण,शापिक शेठ, प्रताप जाधव, अशोक पाटील, संतोष राठोड,रमेश चव्हाण, राहुल राठोड, गौतम जाधव, काशिनाथ राठोड,अंबादास जाधव, ईश्वर जाधव,सुदाम शिपाई, समाधान नायक, उत्तम जाधव आदी गावकरी मंडळी व श्री गोपीभाऊ जाधव जि.प.सदस्य सरपंच व ग्राम पंचायत सदस्य यांच्या वतीने मा.मंत्री ना.अब्दुल सत्तार साहेब यांचे आभार व्यक्त केले .
Users Today : 47