सोयगाव तालुक्याचे शंभर टक्के खरिपाचे पिकांचे क्षेत्र बाधीत झाल्यामुळे दुष्काळ जाहीर

Khozmaster
2 Min Read

दिनांक.21 नोव्हेंबर

सोयगाव तालुक्यात सावळदबारा सह देव्हारी, पिंपळवाडी,चारू,हिवरी अशा अनेक पाझर तलाव व धरण क्षेत्रातील  दुष्काळ जाहीर केल्यामुळे  वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे

सोयगाव तालुक्यात दुष्काळाचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीचे पंचनामे पुर्ण झाले आहेत तालुक्याचे शंभर टक्के खरिपाचे पिकांचे क्षेत्र बाधीत झाल्याचा अहवाल दुष्काळाचा सर्वेक्षण अहवाल कृषी खात्याच्या विविध पथकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला आहे या अनुषंगाने सावळदबारा सह देव्हारी, पिंपळवाडी, चारू,हिवरी, अशा अनेक पाझर तलाव व धरण क्षेत्रातील वीजवितरण व पाटबंधारे विभागाच्या वतीने वीजपुरवठा खंडित करण्यात आले आहे खरिपाच्या शेवटच्या सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी च्चा पाऊसामुळ सावळदबारा क्षेत्रातील बर्याच पाझर तलाव व धरण क्षेत्रांत 70 ते 80 टक्के पाणी साठा आल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, भुईमूग पिकाची लागवड केली होती असे असताना शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना किंवा कायदेशीर नोटीस न देता मोटारीची वीज कनेक्शन तोडण्यात आली आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील गहू हरभरा भुईमूग अशा पेरलेल्या पिकांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे वीजपुरवठा खंडित केल्याने दीड महिना झालेल्या पिकांना दोन पाणी फिरल्यावर वीज कनेक्शन तोडण्यात आली आहे शेतकऱ्यां समोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे खरिपाचे पिंके गेले आता शासनाच्या कारवाईमुळे रब्बी हंगामी गेली या रब्बी हंगामातील गहू हरभरा भुईमूग याही पिकांचे पंचनामे करून यांचे ही शासनाने नुकसान भरपाई देण्यात यावी किंवा जानेवारी पर्यंत धरणं क्षेत्रातील वीजपुरवठा 25 नोव्हेंबर पर्यंत वीज कनेक्शन न जोडल्यास आम्ही सर्व शेतकरी याच धरणात जलसमाधी घेऊ अशी संताप जनक प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आली
……………..
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव

Ramesh Chavhan

KhozMaster
Mehkar
Mob.No. 9657451596
0 9 4 6 9 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *