नंदुरबार -: सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून 15 ते 29 वयोगटातील युवकांमध्ये एकात्मकतेची भावना जागृत करुन; युवावर्गातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी, नंदुरबार जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने जी. टी. पाटील महाविद्यालयात (नंदुरबार) येथे 30 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2023-2024 मध्ये सांस्कृतिक समुह लोकनृत्य, वैयक्तिक सोलो लोकनृत्य, समुहलोकगित, वैयक्तिक सोलो लोकगित, कौशल्य विकासावर कथा लेखन, हिंदी, इंग्रजी व मराठी, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा हिंदी, इंग्रजी, फोटोग्राफी व संकल्पनांवर आधारित स्पर्धा तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान नाट्य, पथनाट्य, एकांकीका, प्रदर्शन, पाककला, रांगोळी तसेच युवा कृती प्रदर्शन हस्तकला, वस्त्रोदयोग, ॲग्रो प्रोडक्ट अशा विविध प्रकारात विविध प्रकारातील प्राविण्य प्राप्त स्पर्धकांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.
यासाठी जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालय, कला व क्रीडा मंडळे या इच्छुक कलावंतांनी, स्पर्धकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. व आपले प्रवेश अर्ज 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करावे. अधिक माहितीसाठी मुकेश बारी, भ्रमणध्वनी क्र. 8087492382 व मनोज शेवाळे भ्रमणध्वनी क्र. 9421571511 यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
Users Today : 11