शेतकरी समृद्धी साठी सिंचन, दुग्ध व्यवसाय, मस्यशेतीसह शेतमालाचे उत्पादन वाढवीण्याची गरज ना. गडकरी

Khozmaster
4 Min Read

मुर्तिजापुर( मोहम्मद रिज़वान सिद्दीक़ी )
ना.गडकरी यांचे हस्ते मुर्तिजापुर मतदार संघातील २४०० शे. कोटी रु.च्या लोकार्पण व भुमीपुजन विकास कामाचे डिजीटल उद्घाटन रस्ते विकास कामांसाठी खा.संजय धोत्रे व स्व.गोवर्धन शर्मा यांनी पाठपुरावा केल्याचा भाषणात आवर्जून उल्लेख व आठवणींना दिला उजाळा
आम.पिंपळे यांनी आपल्या बुलंद आवाजात दणाणून सोडला सभा मंडप
भाजप प्रेमीसह नागरीकांनी केली मोठ्या प्रमाणात गर्दी
पोलिस व सुरक्षा व्यवस्थेचा कडेकोट बंदोबस्त
विदर्भाच्या रस्त्यांची कामे भरपूर झाली असून उर्वरित कामे देखील झपाट्याने होतील मात्र खऱ्या अर्थाने विदर्भ व येथील शेतकरी सुखी समृद्ध होण्यासाठी जल संवर्धन,सिंचन, दुग्ध व्यवसाय मत्स्य शेती या क्षेत्रात तसेच प्रमुख पिक कापूस व सोयाबीन उत्पादन वाढविण्याची गरज असल्याचे सुखाचा मंत्र केंद्रीय दळणवळण मंत्री ना.  नितीन गडकरी यांनी दिला.क
मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुर्तिजापुर मतदार संघातील  अमरावती कुरणखेड राष्ट्रीय महामार्ग ५३ चौपदरी करण 912कोटी रु., कुरणखेड ते शेळद 872 कोटी करु. चे चौपदरीकरण व मुर्तिजापूर खेर्डा कारंजा मार्गांच्या चौपदरीकरण 594कोटी रु. चे भुमीपुजन कार्यक्रम डिजीटल उद्घाटन प्रसंगी एम. आय. डी. सी. रोड मुर्तिजापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी दिला.
पुढे बोलताना त्यांनी तयार करण्यात आलेल्या महामार्गाचे कलकत्ता ते गुजरात बार्डर पर्यंत चा ७०००ह.कोटीचा मार्ग जवळपास पुर्ण झाल्याचे सांगून याला जोडल्या जाणारी राज्य व त्यामुळे साधला जाणारा विकास याबद्दल माहिती दिली.
मात्र याबरोबरच त्यांनी विविध क्षेत्रात विकासाच्या असलेल्या संधी नवीन तंत्रज्ञानाची जोड देवून शेतकरी सजालाम सुफलाम होण्यासाठी जल संवर्धन यामध्ये खोलीकरण, शेततळी बांधने पाण्याची साठवणूक विहीरीवर सोलर पंप इ.चा वापर दुग्ध व्यवसायातील संधी त्यासाठी राबविण्यात येणारा मदर डेअरी प्रकल्प, गुरांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पशु खाद्य निर्मिती साठी सुरू करण्यात येणारे कारखाने काऊ फार्म हाऊस, मत्स्यव्यवसाय इ.चे प्रकल्प शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरून शेतकरी समृद्ध होणार असल्याचे म्हटले.

वेळेवर सुरू झालेल्या कार्यक्रमात सर्व प्रथम दिप प्रज्वलन करण्यात येवून ना.गडकरी यांचा हरिष पिंपळे हस्ते व मान्यवरांचे उपस्थित शाल, श्रीफळ व भेटवस्तू देवून सत्कार केला.
व्यासपीठावर खा. अनिल बोंडे,खा.भावनाताई गवळी, प्रदेश सरचिटणीस तथाआम.रणधीरभाऊ सावरकर,आम. प्रकाश भारसाकडे,आम राजेंद्र पाटणी आम. वसंत खंडेलवाल,आम. प्रताप अडसड,अनुप धोत्रे,विजय अग्रवाल, किशोर मांगटे पाटील,कृष्णा शर्मा, मोनालीताई गावंडे, सौ. नुतनताई पिंपळे जयंत म्हैसने, भुषण कोकाटे, रितेश सबाजकर, विनय वारे  सा.बा. विभागाचे ढगे तसेच जयस्वाल, शेलार यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक असाती यांनी रस्ते कामाविषयी माहिती दिली. आम.पिंपळे यांनी सोनेरी क्षण म्हणून वर्णन करतांना यापुर्वी सदर रोडवर झालेले अपघात व बेघर झालेली कुटुंब या पीडितांची व्यथा सांगत रोडचे कामामुळे अपघात मुक्त झाल्याचे सांगून ना. गडकरी यांचे आभार व्यक्त करीत येणाऱ्या निवडणुकीत भाजपाची सरशी होवून ना.गडकरी यांचे माध्यमातून विविध क्षेत्रात विकास कामे होतील म्हणून सांगितले. तर आम. रणधीर सावरकर यांनी ना. गडकरी हे विदर्भाचा बॅकलॉग कमी करण्याचे काम करीत असून भविष्यात वाढती रहदारी लक्षात घेऊन वाशिम बायपास फ्लॉय ओव्हर व एम आय डी.सी.अंडरपासकरण्याची आवश्यकता मांडली यावेळी भावना गवळी,प्रकाश भारसाकडे, राजेंद्र पाटणी, प्रताप अडसड यांनी देखील मनोगत व्यक्त करीत विकास कामांची मागणी केली. यावेळी उपविभागीय अधिकार   संदीपकुमार अपार  तहसीलदार शिल्पा बोबडे माजी आमदार नारायण गव्हाणकर जिल्हा सचिव सचिन देशमुख
भाजप तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे रितेश  सबाजकर  माजी नगराध्यक्ष मोनाली कमलाकर गावंडे माजी  न पा  उपाध्यक्ष लखन अरोरा   कविता राहुल गुल्हाने राजू कांबे भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष हर्षल साबळे पप्पू मुळे कोमल तायडे कमलाकर गावंडे   राहुल गुल्हाने  विनायक  वारे  अमित नागवान  अमोल  प्रजापति  गोपाला दायमा   प्रशांत हजारी  संतोष  भांडे   सुनिल  लशुवानी   बाबुभाऊ देशमुख (कुरूम) राम  खंडारे  नितिन भटकर    मुकेश कांबे  व इतर अनेक  कार्यकर्ते उपस्थित होते

शेगाव- देवरी फाटा मार्गावर पूर्णा नदीवर मोठ्या पुलासाठी १०० कोटी, बार्शीटाकळी येथील रेल्वे उड्डाण पुलासाठी १३५ कोटी, तसेच अकोला-अकोट- गांधीग्राम रस्त्यावर पूर्णा नदीवर पुलासाठी ७० कोटी रू. निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज मूर्तिजापूर येथे केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *