नागपूर : सात-बारात फेरफार करून नाव नोंदणी करण्यासाठी दोन हजारांची लाच घेणाऱ्या मौद्यातील चाचेर तलाठी कार्यालयातील महिला तलाठी व कोतवालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी रंगेहाथ अटक केली. काय आहे प्रकरण?तलाठी सुनीता नेमीचंद घाटे (वय ५४, रा. संमती भवन, इतवारी) व कोतवाल किशोर किसन वानखेडे (वय ५४, रा. चाचेर, ता. मौदा) अशी अटकेतील लाचखोरांची नावे आहेत. ३८वर्षीय युवकाच्या वडिलांचे निधन झाले. त्याच्या वडिलांच्या मृत्युपत्रानुसार शेतीच्या सात-बारावर फेरफार करून त्यात युवकाचे नाव समाविष्ट करायचे होते. यासाठी युवकाने तलाठी कार्यालयात अर्ज केला. नाव समाविष्ट करण्यासाठी दोघांनी त्याला तीन हजार रुपयांची मागणी केली. एवढी रक्कम देण्यास युवकाने समर्थता दर्शविली. दोन हजार रुपये दिल्याशिवाय काम होणार नाही, असे दोघांनी त्याला सांगितले. युवकाने लाचलुचपत प्रतिबंधक माकणीकर, अतिरिक्त अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शिवशंकर खेडेकर, प्रवीण लाकडे , त्यांचे सहकारी सारंग बालपांडे, अस्मिता मल्लेलवार, आशू श्रीरामे व अहमद यांनी बुधवारी तलाठी कार्यालय परिसरात सापळा रचला. दोन हजारांची लाच घेताच एसीबीच्या पथकाने घाटे व वानखेडेला अटक केली. दोघांविरुद्ध मौदा पोलिस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांच्याही घराची झडती घेण्यात येत असून, उशिरा रात्रीपर्यंत ही कारवाई सुरू होती.विभागाचे अधीक्षक राहुल माकणीकर यांच्याकडे तक्रार केली.