आई-वडिलांसोबत गाडीत चढला, पण तिकीट नाही; टीसीच्या भीतीने तरुणाची चालत्या ट्रेनमधून उडी अन्…

Khozmaster
2 Min Read

नागपूर: गोंदियाहून कोल्हापूरला जाणाऱ्या चालत्या ट्रेनमध्ये टीसीच्या कारवाईच्या भीतीने तरुणाने चालत्या ट्रेनमधून खाली उडी मारून स्वतःला गंभीर दुखापत करुन घेतली. ही घटना मंगळवारी साडे नऊच्या सुमारास घडली. गोंदिया-नागपूर रेल्वे मार्गावर महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये एक खळबळजनक घटना घडली. महेश संतोष सोनी (वय २३) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तरूणाच्या डाव्या पायाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. रेल्वे पोलिसांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सोनी कुटुंब हे मूळचे रेवा येथील आहे. दिवाळीनिमित्त सोनी कुटुंबीय त्यांच्या मूळगावी रेवा येथे गेले होते. मंगळवारी रीवा मध्यप्रदेश येथून रेल्वेने नागपूरला येत होते. भंडारा येथे बराच वेळ उभी राहिल्याने रेवा इतवारी गाडीला उशीर होत होता. त्यामुळे ते ट्रेनमधून खाली उतरले. तरुण आणि त्याचे पालक महाराष्ट्र एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढले. कुटुंबाने रेल्वेचे तिकीट काढले नव्हते.दरम्यान, ट्रेनमधील टीटीने त्यांना तिकीटाबाबत विचारले असता तिकीट नसल्यामुळे महेश घाबरला. तिकीट नसल्यामुळे टीटी म्हणाले की, तिकीट न दिल्यास दंड भरावा लागेल आणि तुरुंगात जावे लागेल. कारागृहात जायचं ऐकून महेश घाबरला आणि त्याने कामठी रेल्वे स्थानक येण्यापूर्वीच चालत्या ट्रेनमधून उडी मारली. ज्यात तो गंभीर जखमी झाला. पालकांचा आरडाओरडा ऐकून रेल्वे सुरक्षा दलाने खाली पडलेल्या तरुणाला तातडीने उचलून प्रथम रेल्वे रुग्णालयात व नंतर कामठी येथील आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर त्यांना नागपूरच्या मेयो रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.वेग कमी असल्याने धोका टळला. ही घटना घडली त्यावेळी कामठी रेल्वे स्टेशनजवळ असल्याने गाडीचा वेग कमी होता. यामुळे महेश गंभीर जखमी झाला असला तरी त्याच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. येथे घटनेची माहिती मिळताच इतवारी रेल्वे स्थानकाचे सहायक निरीक्षक आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. आपल्या मुलाच्या या स्थितीला जबाबदार असलेल्या टीटीवर कारवाई करावी, असा आरोप जखमी तरुणाच्या पालकांनी केला आहे. रेल्वे पोलिसांनी जखमी तरुणाचे जबाब नोंदवले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *