जऊळका ते माळेगाव रस्ता कधी दुरुस्त होणार सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांच्या फक्त रस्ता पहानी करिता कोरड्या वाऱ्या रस्त्याचे टेंडर निघूनही तीन वर्षापासून रस्ता दुरुस्त होईना

Khozmaster
2 Min Read
सैय्यद इमरान मालेगाव प्रतिनिधी
 मालेगाव तालुक्यातील अकोला जिल्ह्याला जोडणारा मुख्य जऊळका ते माळेगाव वाहतूक रस्ता गेल्या तीन वर्षापासून फक्त कागदी घोड्याच्या पाठीवर वावरात असून सदर रस्त्याच्या दुरुस्ती करिता सार्वजनिक बांधकाम विभागाला मुहूर्त मिळेना जिल्ह्यातील प्रमुख मुख्य रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून सदर रस्त्यावर मोठ मोठाले खड्डे पडले असून त्या रस्त्यात वाहनधारकांना वाहन चालवणे ही दुरापत झाले आहे त्यामुळे जड वाहतूक असणाऱ्या अनेक वाहनधारकांनी जऊळका ते अमानवाडी दरम्यान आपले वाहन टाकने बंद केले असून अनेक सुविधा पासून नागरिकांना वंचित राहावे लागत आहे अमानवाडी येथे भारत गॅस एजन्सी असून तसेच कृषी सेवा केंद्र असल्यामुळे मोठ्या जडवाहनातून तेथे माल पोहोचवा लागतो परंतु रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहनधारकांनी सदर गावाला मालाचा पुरवठा रस्ता दुरुस्त होईपर्यंत होणार नाही असा पवित्रा घेतल्याने गॅस एजन्सी धारकासह कृषी केंद्र चालकांची मोठी गोची होत आहे जऊळका ते अमानवाडी आठ किलोमीटर अंतर असून हे अंतर कापण्या करिता मोठ्या वाहनाला एक ते दीड तास लागतो त्यामुळे वाहनाला जास्तीचे डिझेल खर्ची करावे लागते त्यामुळे बऱ्याच वाहनधारकांना वाहन आणणे परवडत नाही तसेच मोटरसायकल चालकाला रस्त्यावरून जात असताना अनेक गोष्टीचा सामना करावा लागत असून अनेकवेळा छोटे-मोठे अपघात होऊन कायमची जायबंदी होत आहे
सदर रस्त्याची शासकीय टेंडर मागील दोन महिन्यापासून निघाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाला मात्र त्याचा मुहूर्त अजूनही मिळेना तरी संबंधित विभाग व राजकीय पदाधिकाऱ्यांनी सदर रस्त्याच्या दुरुस्ती बाबत लवकर सुरुवात करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकाकडून होत आहे.
0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *