Devgad Hapus: हंगामपूर्व देवगड हापूस पुण्यात दाखल; डझनचा भाव ऐकून बसेल झटका

Khozmaster
1 Min Read

पुणे : देवगड हापूसच्या आगाप उत्पादनातील (हंगामपूर्व) आंबा रविवारी (२६ नोव्हेंबर) पुण्यात दाखल झाला. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात आडते असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष युवराज काची यांच्या गाळ्यावर पाच पेट्यांचे आगमन झाले.

पाच पेट्यांपैकी पाच डझनाच्या एका पेटीला २१ हजार रुपये दर मिळाला. अन्य पेट्यांना १५ हजार आणि ११ हजार रुपये दर मिळाला. कोथरूड येथील जोतिराम बिराजदार आणि जगन्नाथ वंजारी यांनी हा आंबा खरेदी केला. देवगड येथील रज्जाद काची यांच्या बागेतील हा आंबा असून, मुंबईहून पुण्यात झाला. ‘टप्प्पाटप्प्याने देवगड हापूसचा हंगाम सुरू होऊन, फेब्रुवारीमध्ये नियमित हंगाम सुरू होईल,’ अशी माहिती युवराज काची यांनी दिली.आगाप हंगाम म्हणजे काय ?

कोकणातील हापूस आंब्याचा नियमित हंगाम फेब्रुवारीपासून सुरू होतो. या हंगामापूर्वी काही शेतकरी नियोजन करून आंब्याचे उत्पादन घेतात. त्याला आगाप हंगाम म्हटले जाते. यामध्ये मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात आंब्यांच्या बागांमध्ये पाणी व्यवस्थापन केले जाते. मे महिन्यातच झाडांना जीवामृत दिले जाते. दर १५ दिवसांनी त्याची मात्रा दिली जाते. जूनमध्ये खत टाकले जाते. या झाडांना ऑगस्टमध्ये मोहोर येतो आणि नोव्हेंबरअखेर किंवा डिसेंबरमध्ये फळ येते.

0 9 4 1 7 7
Users Today : 13
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *