नववर्षात ‘रिंग रोड’ला मुहूर्त; लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या हालचाली

Khozmaster
3 Min Read

पुणे : पुण्याचा विकासासाठी द्रुतगती महामार्ग ठरू शकणाऱ्या ‘रिंग रोड’च्या कामांना लोकसभा निवडणुकीच्या आधी मुहूर्त मिळण्याची चिन्हे आहेत. रिंग रोडच्या कामांचे भूमिपूजन येत्या जानेवारी किंवा फेब्रुवारीत केले जाणार असल्याचे संकेत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळांकडून (एमएसआरडीसी) देण्यात येत असून, त्या दृष्टीने महामंडळाकडून नियोजन सुरू झाले आहे.डिसेंबरअखेर भूसंपादन

पुरंदर, भोर, मावळ, खेड, मुळशी या पाच तालुक्यांमधून रिंग रोड जात आहे. पूर्व भागातील ४८ आणि पश्चिम भागातील ३१ अशा सुमारे ८० गावांमधून हा रिंगरोड जात आहे. पश्चिम भागातील सुमारे ३१ गावांचे निवाडे जाहीर झाले आहेत. त्यापैकी ८० टक्के भूसंपादन पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. येत्या डिसेंबर अखेरपर्यंत भूसंपादन होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली. पश्चिम भागातील २६० हेक्टर जागा संमतीने संपादित झाली असून, ३७० हेक्टर क्षेत्राचे निवाडे जाहीर झाले आहे. रिंग रोडचे प्रत्यक्ष कामासाठी एकूण जमिनीपैकी सुमारे ८० टक्के भूसंपादन आवश्यक असून, ते डिसेंबरच्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे.

चार कंपन्यांची यादी‘एमएसआरडीसी’ने काही महिन्यांपूर्वी निविदा पूर्व प्रक्रिया राबविली होती. त्यानुसार, चार कंपन्याची निविदेसाठी यादी तयार करण्यात आली आहे. डिसेंबर-जानेवारी दरम्यान निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याने रिंगरोडचे काम करणारी एजन्सी निश्चित होईल.

‘मटा’कडून पाठपुरावा

पुण्यात रिंग रोड उभारणीबाबत सातत्याने चर्चा सुरू आहे. मात्र, वेगवेगळ्या कारणांनी त्याचे नियोजन रखडले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिंग रोडबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने आयोजिलेल्या ‘पुणे सुपरफास्ट’ कार्यक्रमात त्यांनी रिंग रोडला चालना देणार असल्याचे नमूद केले होते. रिंग रोड म्हणजे हे पुण्यासाठी आर्थिक विकासाचे केंद्र ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले होते. रिंग रोड प्रकल्प लवकर मार्गी लागावा यासाठी ‘मटा’ सातत्याने पाठपुरावा करीत आहे. नव्या वर्षात त्याला मूर्त स्वरूप मिळण्याची चिन्हे आहेत.अडीच वर्षांत काम होणार

पश्चिम भागाचे डिसेंबरअखेर, तर पूर्व भागाच्या रिंगरोडसाठी भूसंपादनाची प्रक्रिया मार्चपर्यंत पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही टप्प्यांचे रिंगरोडचे काम स्वतंत्रपणे सुरू न करता एकत्रितरीत्या पुढील वर्षी मार्च-एप्रिल महिन्यात सुरू करण्याचे नियोजन आहे. हे काम अडीच वर्षांमध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे. अपेक्षेप्रमाणे रिंगरोडचे काम या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरू व्हायला हवे होते. मात्र, भूसंपादन प्रक्रियेला लागलेल्या विलंबामुळे बांधकाम खर्चातही १० ते १५ टक्के वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.दृष्टिक्षेपात रिंग रोड

६५ किमी
पश्चिम रिंग रोडची लांबी

७४.०८ किमी
पूर्व रिंग रोडची लांबी

३१ किमी
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून होणारे काम

रिंग रोडमध्ये काय असेल? १४ इंटरचेंज
– ४ बोगदे
– आठ पादचारी अंडरपास
– सहा लहान वाहनांचे अंडरपास
– १३ हलके वाहन अंडरपास
– ३७ वाहनांचे अंडरपास
– २८ वाहनांचे ओव्हरपास
– तीन रेल्वे पूल
– १६ मोठे पूल
– ३८ छोटे पूल

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *