कवठे येमाई दि. ०६ : (प्रतिनिधी,प्रा.सुभाष शेटे) – शिरूरच्या बेट भागातील महावितरणच्या टाकळी हाजी विभागीय कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ पदावर कार्यरत असणारे अनिल गोबाळे यांच्या धाडसी कामाचे सध्या परिसरातून खुप कौतुक होत आहे.नुकत्याच टाकळी हाजी परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. मात्र महावितरणचे टाकळी हाजी कार्यालयातील कार्यतत्पर कर्मचारी अनिल गोबाळे यांनी त्याच दिवशी मध्यरात्री ग्रामस्थांच्या आग्रहाखातर विद्युत खांबावर चढून काही झाडाच्या फांद्या तोडून अडचणीतून मार्ग काढून वीज पुरवठा पूर्ववत केला. त्यांच्या या कामगिरीबद्दल परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अनेक दिवसांपासून टाकळी हाजी येथे महावितरण कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने नागरिकांनी याबाबत अनेकदा आवाज उठविला होता. त्यामुळे काही अडचण आल्यास वीजपुरवठा पूर्ववत होण्यास कित्येकदा विलंब लागत होता. या कार्यालयात काम केल्याने पूर्वीचा अनुभव असलेले अनिल गोबाळे यांची पुनश्च येथे नेमणूक झाल्याने परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.वीज गेल्यावर शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिसरात बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून अनेक पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला आहे. यामुळे अनिल गोबाळे यांनी दाखवलेल्या कार्यत्परतेचे व त्यांच्या कामाचे विशेष कौतुक होत आहे.
महावितरणच्या अनिल गोबाळे यांच्या धाडसी कामाचे कौतुक – मध्यरात्री विद्युत खांबावर चढून वीज पुरवठा केला पूर्ववत

0
6
7
5
1
0

Leave a comment