पुणे : शिरूर तालुक्यातील बेट भागात अवकाळी पावसाकने मोठा धुमाकूळ घातला आहे. अचानक गारपीट आली आणि शेतकऱ्याच्या शेतात पाणीच पाणी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिकं या गारपिटीमुळे वाया गेली असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
शिरूर तालुक्यात असणाऱ्या बेट भागामध्ये आज सायंकाळच्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाला. बघता बघता पावसाने उग्र रूप धारण केले.अचानक वादळी वारे आणि गारांसह जोरात पाऊस सुरू झाला. त्यामुळे शेतकऱ्याची एकच तारांबळ उडाली. यामधे अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले असून डांळीब बाग, कांदा रोपे, भाजीपाला पिके यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सध्या शेतकरी कांदा लावगडीसाठी रोपाची तयारी करीत होते, ही रोपे पूर्णपणे गारांच्या मारामुळे भुईसपाट झाली आहेत.
जळगावातील चाळीसगावमध्ये गारपीट
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील काकळणे परिसरात तुफानी गारांसह अवकाळी पाऊस पडला. काही भागात शहरात हवा वादळ विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. या अचानक पावसामुळे शहरात तालुक्यातील कपाशी गहू हरभरा अशा इतर पिकांना या गावांच्या पावसामुळे नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तुफान गारपीट झाली आहेत.