काश्मीरमध्ये मुलीचे अपहरण; तरुणांनी नागपुरात आणलं, मात्र फिरण्याच्या मोहाने डाव फसला अन्…

Khozmaster
2 Min Read

नागपूर: सीताबर्डी पोलीस ठाण्यांतर्गत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यात दोन मुस्लिम तरुणांनी आधी जम्मू-काश्मीरमधील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. नंतर तिला नागपुरात आणले. सीताबर्डी परिसरात फिरत असताना पोलिसांनी तिघांनाही थांबवून चौकशी केली. त्यानंतर ही बाब समोर आली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपी तरुणांना अटक केली आहे. तर मुलीला शासकीय वसतिगृहात ठेवण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मुदस्सीर हुसेन मोहम्मद हुसेन (१९) आणि यासीर हुसेन मोहम्मद यासीन (१९) रा. दोडा, जम्मू-काश्मीर अशी आरोपींची नावे आहे. सीताबर्डीचे पीएसआय अनिल मंगळकर हे बुधवारी रात्री सीताबर्डी परिसरात गस्त घालत होते. दरम्यान, एक मुलगी आणि दोन तरुण फिरताना दिसले. तिघांचे वर्तन संशयास्पद वाटल्याने पीएसआयने त्यांना थांबवून येथे फिरण्याबाबत विचारपूस केली. त्यांचे बोलणे संशयास्पद वाटल्याने त्यांनी नीट उत्तर न दिल्याने त्यांना संशय आला. त्यांनी तिघांनाही पोलीस ठाण्यात नेले. तपासादरम्यान मुलगी आणि दोघेही तरुण जम्मू-काश्मीरचे रहिवासी असल्याचे समोर आले.काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. त्याची तक्रार काश्मीरमधील किस्तवाड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. चौकशीत आरोपीने मुलीला तेथून येथे आणल्याचे कबूल केले. तरुणीला हैदराबादला घेऊन जाण्याची दोन्ही तरुणांची योजना होती. दरम्यान, शुक्रवारी रात्री नागपुरात उतरल्यानंतर तिघेही रेल्वे स्थानक परिसरात संशयास्पद अवस्थेत फिरत होते. त्यावेळी गस्तीवर असलेल्या सीताबर्डी पोलिसांना या तिघांवर संशय आला. या तिघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता हे दोन्ही तरुण भाऊ असून मुदस्सीर हुसेन आणि अल्पवयीन हिंदू तरुणी यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले.यासिर हुसेन हा हैदराबादमध्ये वेटर म्हणून काम करतो. नागपुरात त्यांनी गाडी बदलली आणि तिघांनाही हैदराबादला जायचे होते. त्यासाठी तो नागपूरला उतरला. ट्रेनला वेळ असल्याने ते सीताबर्डी परिसरात फिरत होते. दरम्यान, रात्रीच्या गस्तीवर सीताबर्डी पोलीस ठाण्याचे डी.एस. बी. पथकाने हे तिघे फिरताना पाहिले. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तातडीने दोन्ही तरुणांना अटक केली. या अल्पवयीन मुलीला काटोल रोडवरील शासकीय वसतिगृहात ठेवण्यात आले आहे.सीताबर्डी पोलिसांनी ही बाब तत्काळ किश्तवाड पोलिसांना कळवली. माहिती मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस अल्पवयीन मुलीला आणि दोन आरोपींना उचलण्यासाठी रवाना झाले आहेत. यासोबतच पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनाही माहिती दिली आहे. तेही मुलीला घेण्यासाठी निघाले आहे. सीताबर्डी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध आरपीसी १५१(१) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *