मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; या कालावधीत वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार

Khozmaster
1 Min Read

पुणे: मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर कि.मी. ३३/८०० येथे खोपोली ते पालीफाटा (एन.एच.१६६ डी) या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पुलाचे गर्डर बसविण्याचे काम २८ नोव्हेंबर रोजी करण्याचे नियोजन असून या लांबीत पुणे वाहिनीवरील वाहतूक दुपारी १२ ते ३ वा. या कालावधीत पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

या कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक द्रुतगती मार्गाच्या मुंबई वाहिनीमधून अंदाजे १ कि.मी. लांबीसाठी पुण्याच्या दिशेने प्रतिबंधित वेगाने वळविण्यात येणार आहे. तसेच याच कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक सदर लांबीत नेहमीप्रमाणे मुंबईच्या दिशेने सुरु राहील. काम पूर्ण झाल्यावर दुपारी ३ वाजता मुंबईहुन पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा पुणे वाहिनीमधून सुरु करण्यात येईल.

या कालावधी दरम्यान द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ९८२२४९८२२४ वर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या ९८३३४९८३३४ या क्रमांकावर सपंर्क साधावा, असे महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
0 9 4 1 7 2
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *