अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त पिकांच्या नोंदी करा – कृषि विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

Khozmaster
2 Min Read

बुलडाणा, दि. 28(जिमाका): जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, विमा काढलेल्या पिकांचे ॲपवर नोंदी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

 जिल्ह्यात 27 व 28 नोव्हेंबर रोजी झालेल्या बिगर मौसमी पावसामुळे तसेच वादळी वाऱ्यामुळे खरीप आणि रब्बी पिकांचे नुकसान झाल्यामुळे त्या पिकांची नोंद घेण्यात यावी. ही नोंद घेताना शेतकऱ्यांनी पुढील काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कपाशी, तूर, खरीप ज्वारी, गहू, हरभरा या पिकांच्या नोंदी घेताना नुकसानीचे कारण हे Unseasonal rain (बगर मोसमी पाऊस),  Hailstorm (गारपीट) या दोन्हीपैकी ज्या कारणामुळे पीक नुकसान झाले आहे तेच कारण नमूद करावे.

  कापूस, तूर, गहू, हरभरा, रब्बी कांदा पिकास standing Crop (उभे पीक) असे नमूद करावे. तर खरीप ज्वारी – काढणी पश्चात नुकसान व crope condition  (cut &spread) असे नमूद करणे आवश्यक आहे.

या पद्धतीने उपरोक्त पिकाचे नुकसान टक्केवारी व इतर आवश्यक माहिती परिपूर्ण सादर करून पूर्वसूचना देण्याबाबत शेतकऱ्यांना अवगत करून घटना घडल्यापासून 72 तासांचे आत पूर्वसूचना देणे आवश्यक राहिल.

नुकसान पूर्वसूचना खालील पद्धतीने नोंदवता येईल. Crope inssurance app, भारतीय कृषी विमा कंपनी toll free क्रमांक 18004195004, निशुल्क क्रमांक उपलब्ध न झाल्यास आपत्तीची माहिती विमा कंपनीचे तालुका, जिल्हा कार्यालय येथे द्यावी व पोच ठेवावी. या तिन्ही माध्यमातून पूर्वसूचना देता न आल्यास  तालुका स्तरावरील कृषी विभागास पूर्वसूचना देण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

0 6 2 5 7 0
Users Today : 206
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *