अजमेरची दर्गा आणि संभलच्या जामा मशिदीचा कथित सर्वेक्षण असंवैधानिक !ओपन मुस्लिम कोअर कमिटीतर्फे जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवले

Khozmaster
3 Min Read

बुलढाणा:-अल्पसंख्याक समाजातील लोकांना आणि त्यांच्या धार्मिक स्थळांना जाणीवपूर्वक लक्ष्य करून देशभरात जातीयतेढ निर्माण केले जात आहे. अलीकडेच उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील शाही जामा मशीद आणि राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती अजमेरी यांची दर्ग्याच्या कथित सर्वेक्षणाच्या आदेशामुळे अप्लसंख्याक समाजात अशांतीच वातावरण आहे. देशात सामाजिक शांतता नांदावी म्हणुन सदर सर्वेक्षणाचे आदेश तात्काळ रद्द करून सर्व प्रकारच्या सर्वेक्षणच्या याचिका फेडाण्यात यावी अशी मागणी ओपन मुस्लिम कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवून करण्यात आली आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, सन 1991 मध्ये लोकसभा सभागृहात प्रत्येक धर्माच्या पूजास्थाळांच्या संरक्षणासाठी कायदा करण्यात आला होता. १५ ऑगस्ट १९४७ पूर्वी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळाचे अन्य कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळात रूपांतर करता येणार नाही, असे या कायद्याद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. या कायद्याचे कोणी उल्लंघन करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कठोर कारवाईची तरतूद आहे. सदर कायदा अस्थित्वात असतांना एकापाठोपाठ एक अल्पसंख्याक समाजाच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करून कथित सर्वेक्षाणाच्या नावाखाली अल्पसंख्याक समाजाच्या धार्मिक भावांशी खेळण्याचा प्रकार देशात काही लोक करीत असल्याचे आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सुमारे 850 वर्षांपूर्वी राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती अजमेरी र. दर्ग्याच्या कथित सर्वेक्षणाची याचिकाही मंजूर करण्यात आली आहे. हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्ग्यावर देशाच्या पंतप्रधानांसह विविध देशांतील भाविकभक्त चादर चढविण्यासाठी पाठवित असे. पण काही लोक देशाची अखंडता आणि एकता नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. जे लोक देशाची एकता, अखंडता, बंधुत्वता तोडण्याच्या प्रयत्न करीत आहे त्यांचेवर कठोर कार्रवाई करावी सोबतच उत्तर प्रदेशच्या संभज जिल्ह्यातील जामा मशीद हत्याकांडाची न्यायालयीन चौकशी करून पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये देण्यात यावे, कुटुंबातील एकाला शासकिय नोकरी देण्यात यावी, मशीदीचा कथित सर्वेक्षणाची याचिका फेटाळण्यात यावी, अजमेर शरीफच्या दर्ग्याचे कथित सर्वेक्षणाची याचिका तत्काल फेटाळण्यात यावी अशी मांगणी ओपन मुस्लिम कोअर कमिटी बुलढाण्याच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी हाजी सैयद बिलाल, इकबाल अहेमद, शेख जावेद, जुबेर खान, सैयद आसिफ, अड.सैयद आरिफ, सैयद जुनेद, आदिल भाई, अशरफ भाई, दानिश अजहर, इकबाल टेलर, हाफिज रईस, कारी कलीम खान, मोईनोद्दीन काझी, मुबश्शीर अहेमद, मुजफ्फर खान, अब्दुर्ररहेमान खान, शेख नदीम, नजीर भाई, शेख रहीम, अड.राज शेख, सैयद जुनेद डोंगरे, शेख शोएब, उबैदुल्लाह खान, राजु आरिफ सेठ, रशीद साहेब, शहेजाद नवाब, शेख सलीम, सैयद मुजीब डोंगरे, शफिक खान, मो.नईम शानु, शेख इलयास, जुबैर मोहम्मद खान, कय्युम खान, राशिद लाला, यासीर भाई आदि उपस्थित होते.

0 9 5 0 6 6
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *