जिल्हा लोकशाही दिन 4 डिसेंबर रोजी

Khozmaster
1 Min Read

बुलडाणा, दि. 29(जिमाका): सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी, गाऱ्हाणी, अडचणी जाणून घेण्यासाठी व तक्रारींचे निरसन करण्यासाठी जिल्हा लोकशाही दिन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित केला जातो. दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी (सोमवार) दुपारी 1 वाजता लोकशाही दिनाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे.

त्याबाबत अर्जदारांना लोकशाही दिनात अर्ज सादर करावयाचा असल्यास, तालुका स्तरावरील लोकशाही दिनात सदर तक्रारीचे निराकरण होवून प्राप्त अहवालानुसार समाधान न झाल्यास तालुका स्तरावरील प्राप्त अहवाल आणि टोकन क्रमांक जोडून जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात अर्जदाराने अर्ज विहीत नमुन्यात दोन प्रतीत अर्ज पाठविणे आवश्यक राहील तसेच तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावी अन्यथा अर्ज विचारात घेण्यात येणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी कळविले आहे.

0 9 4 1 7 2
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *