*ट्रॅक्टरमधून पडून मागील वाहनाने चिरडल्याने वारकऱ्याचा मृत्यू शेगाव–खामगाव मार्गावर लासुरा फाट्याजवळ पहाटे अपघात**

KHOZ MASTER
1 Min Read

 शेगाव प्रतिनिधी 
संत गजानन महाराजांच्या प्रगटदिन उत्सवासाठी शेगावकडे येणाऱ्या एका वारकऱ्याचा ट्रॅक्टरमधून पडून त्यानंतर मागील वाहनाने चिरडल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (७ फेब्रुवारी) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. ही दुर्घटना शेगाव–खामगाव मार्गावरील लासुरा फाट्याजवळ घडली.

जनार्दन दगडू गाडेकर (वय ६५) असे मृत वारकऱ्याचे नाव असून ते बुलढाणा तालुक्यातील सावळा येथील रहिवासी होते. ते बुलढाण्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर यांचे वडील होते.

प्राप्त माहितीनुसार, जनार्दन गाडेकर हे दिंडी सोहळ्यासोबत शेगावकडे प्रवास करीत होते. दरम्यान, ते ट्रॅक्टरमध्ये बसून असताना अचानक तोल जाऊन रस्त्यावर पडले. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच त्यांना तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेमुळे दिंडीतील वारकरी तसेच परिसरात शोककळा पसरली. नातेवाइकांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला. सावळा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

या प्रकरणी पुढील तपास संबंधित पोलीस करीत आहेत.

0 9 6 8 8 5
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *