अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांवर संकट….

Khozmaster
1 Min Read
अवकाळी पावसामुळे देऊळगाव साकर्षा मध्ये मोठे नुकसान
देऊळगाव साकर्षा – शिवानंद पवार – कृषिविषयक बातमी 
दिनांक 26 आणि 27 रोजी  रात्रभर अवकाळी पावसाने झोड़पून काढले. या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे…
यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे धरणे भरली नाही..अगोदरच खरीप पिकाच्यावेळी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पिकांच्या प्रमाणात घट आली आहे.
 या दोन दिवसात अचानक झालेल्या वादळी पावसामुळे गहू,  हरभरा , तूर, फळबाग तसेच इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांवर संकटाचे वातावरण निर्माण झाले आहे .
विशेष म्हणजे पावसाळ्यात पण इतका पाऊस झाला नाही तितका या दोन दिवसाच्या माध्यरात्रीत कोसळला.
 शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना पाठबळ द्यावा.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *