चिखली: 30 नोव्हेंबर 2023
सुमारे दोन वर्षापासुन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे प्रषासकीय कार्यकाळ असलेल्या चिखली नगर परिषद प्रषासनाचे नागरी समस्यांकडे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. परिणामी विविध ज्वलंत नागरी समस्यांच्या विळख्यात सर्वसामान्य नागरीक अडकला आहे. शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याने डेंगु हिवताप इत्यादी रोगांनी थैमान घातले आहे. शहराला होणारा पिवळया रंगाचा व दुषीत पाणीपुरवठयामुळे नागरीक हवालदिल झाले आहेत. चिखलीकरांना मुलभूत सुविधा पुरविण्यास अकार्यक्षम ठरत असलेल्या नगर परिषदेत मनमानी, भ्रष्टचारी व गलथान कारभाराने कळस गाठला आहे. झोपेचे सांेग घेणा-या नगर परिषदेला जागे करण्याकरीता आज कॉग्रेस व महाविकास आघाडीचा विराट डफडे बजाओ मोर्चा नगर परिषदेवर धडकला. मुख्याधिकारी व नगर परिषद प्रषासनाने येत्या काळात आपल्या कार्यपध्दतीत बदल करून कारभार सुधरावा तसेच कमिषनखोरीमुळे जनतेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये अन्यथा खुर्चीत बसु नसल्याचा झणझनीत इषारा बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी न.प. प्रषासनाला दिला आहे. या मोर्चात कॉग्रेसह महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जिल्हाध्यक्षा माजी आमदार सौ. रेखाताई खेडेकर, षिवसेना उबाठा संपर्क प्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर, या प्रमुख नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते तथा नागरीक व महिलांची मोठया संख्येने उपस्थिती होती. निवेदन स्विकारण्यास नगर परिषदेचे प्रषासक मुख्याधिकारी यांच्या अनुउपस्थिीमुळे आंदोलनकर्ते सतंप्त झाले होते हे येथे उल्लेखणीय.
शहरातील डि.पी.रोड वरील हिंदुसुर्य महाराणा प्रताप यांना वंदन करून या विराट मोर्चाला बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्या नेतृत्वात सुरूवात करण्यात आली. महाविकास आघाडीच्या वतीने गलथान, भ्रष्टाचार,मनमानी कारभाराचा कळस गाठणा-या न.प.प्रषासना विरूध्द आंदोलन करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गावरून महापुरूषांच्या पुतळयांना अभिवादन करून हा मोर्चा नगर परिषदेवर धडकला. यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी आपल्या दालनातुन गैरहजर असल्याने आंदोलन कर्त्यांच्या सतंप्त प्रतिक्रीया उमटत होत्या. यावेळी प्रसार माध्यमांषी बोलतांना राहुलभाउ बोंद्रे पुढे म्हणाले की, निवडणुका लांबणीवर पडल्याने प्रषासकाच्या माध्यमातुन सत्ताधिकारी, लोकप्रतिनधी, नगर परिषेदेचा कारभार करत आहे. शहरात डेंगु आजाराने थैमान घातले असुन सर्वच दवाखाने हाउसफुल झाले आहे, न.प.प्रषासकीय कार्यभारावर कुणाचाच अंकुष उरला नाही, सर्वत्र अस्वच्छता पसरली, नाल्या तुंडूब भरल्यात, रस्त्याची साफसफाई होत नाही, अनेक पथदिवे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पाहवयास मिळते, यापूर्वी लाखो रूपयात होणा-या साफसफाईचे टेंडर सुमारे 2 कोटी 80 लाखाच्या घरात कसे पोहचले ? नगर परिषदेत प्रचंड भ्रष्टाचार माजला असुन सफाईचे टेंडर घेणा-या ठेकेदाराने स्वतःचे मजुर व गाडया लावायला पाहीजेत, मात्र ठेकेदाराच्या नावाखाली सत्ताधा-यांच्या जवळचेच ठेकेदारी करतात, पुर्वी 50-60 लाखात होणा-या रस्त्यांचे टेंडर कोटयावधीच्या घरात, तर 4-5 लाखात निर्माण होणा-या कमानींचे तर 30-45 लाखा पर्यंत अव्वाच्या सव्वा बिले काढण्याचा विक्रमी भ्रष्टाचार नगर परिषदेत माजला आहे. मुख्याधिकारी पुर्णवेळ हजर का राहत नाही हा यक्ष प्रष्न सर्वसामान्यांना पडला आहे. शहराला सतत पिवळया रंगाचा पाणीपुरवठा करण्यात येतो, येत्या काळात नागरीकांच्या आरोग्याषी खेळणा-या मुख्याधिकारी व न.प.प्रषासनाने प्रषासकीय कामकाजाचा दर्जा सुधारला नाही तर कुणालाही खुर्चीत स्वस्थ बसु देणार नाही असा ईषाराही यावेळी राहुलभाउ बोंद्रे यांनी दिला.
यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ.रेखाताई खेडेकर म्हणाल्या गेल्या अनेक महिन्यांपासुन शहराला होणारा पिवळा रंगाचा पाणीपुरवठा ही नागरीकांच्या आरोग्यासाठी गंभीर बाब असुन शहरात सगळीकडे पसरलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डासांच्या वाढत्या संख्यामुळे डेंगु आजाराने थैमान घातले आहे, नागरीकांना मुलभुत सुविधा पुरविण्यास नगर परिषद प्रषासन अपयषी ठरले आहे. जनतेच्या समस्यांचे निवेदन घेण्यास मुख्याधिकारी सतत गैरहजर असतात हाच त्यांच्या अकार्यक्षम व गलथान कारभाराचा पुरावा असल्याचे सांगुन गैरहजर असलेल्या मुख्याधिकारी यांचा निषेध नोंदविला. यावेळी माजी उपनगराध्यक्षा कुणाल बोंद्रे, माजी शहर अध्यक्ष प्रदिप पचेरवाल, माजी नगरसेवक निलेष अंजनकर, श्रीराम झोरे यांनी आपल्या सडेतोड भाषनातुुन नगर परिषद प्रषासनाचे वाभाडे काढीत खरपुस समाचार घेतला. या डफडे बजाओ आंदोलन प्रसंगी माजी नगरसेवक दिपक खरात यांनी संचलन केले तर आभार प्रदर्षन राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष रवि तोडकर यांनी केले.
कॉग्रेस तथा महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या या विराट डफडे बजाओ आंदोलनात अतहरोद्यीन काझी, रवि तोडकर, श्रीराम झोरे, दिपक देषमाने, कुणाल बोंद्रे, डॉ.मोहमंद इसरार, रिक्की काकडे, नंदुभाउ सवडतकर, ज्ञानेष्वर सुरूषे, निलेष अंजनकर, अषोकराव पडघान, सौ. ज्योतीताई पडघान, आषिफभाई, रफिक सेठ, दिपक खरात, राउफ हाजी, गोकुळ षिंगणे, दिपक थोरात, विजय गाडेकर, गोकुळ षिंगणे, राजु रज्जाक, गोपाल देव्हडे, बंडुभाउ कुळकर्णी, श्रीकृष्ण धोंडगे, कपील खेडेकर, नंदु क-हाडे, संतोष वाकडे, प्रलय खरात, प्रितम गैची, विष्वासराव खंडागळे, शाम षिंगणे, विलास सुरडकर, डॉ. ज्योतीताई खेडेकर, दिपक म्हस्के, संजय गाडेकर, सदानंद मोरगंजे, बालुबाई जैवाल, प्रमोद चिंचोले, रत्नाताई सोळंकी, गोलु पवार, तुकाराम सोळंकी, किषोर कदम, साहेबराव डुकरे, प्रदिप पचेरवाल, षिवराज पाटील, राहुल सवडतकर, शहेजाद अल्ली खान, अॅड. प्रषांत देषमुख, डिगांबर देषमाने, मनोज जाधव, जका भाई, खलील बागवान, लिंबाबापु देषमुख, बिदुसिंग इंगळे, पप्पु पाटील, प्रकाष सपकाळ, विजय जागृत, डॉ. अमोल लहाने, रमजान चौधरी, डॉ. घुगे, मोहीत घुगे, जाकीर भाई, राजेष खरात, विलास कंटूले, अखिल भाई, सचिन शेटे, नासेर सौदागर, पवन गवारे, रामधन मोरे, सुनिल पवार, रोहन पाटील, बबलु शेख, हानिफ बाबा, अमीनखॉ उस्मानखॉ, गयास बागवान, बाषिद जमदार,मलीक जमदार, प्रमिलीताई जाधव, दिलीप चवरे, भारत मुलचंदानी, प्रषांत भटकर, दिनकर पडघान, शेषराव साळवे, किषोर साळवे, लक्ष्मण भिसे, जितु मुळावकर, चेतन गायकवाड, अजिम भाई, प्रविण पाटील, बळीराम इंगळे, श्रीकृष्ण इंगळे, षिवा म्हस्के, एन.टी.भुसारी, आकाष गाडेकर, संजय आंभोरे, गजानन आंभोरे, आनंथा जाधव, किष्णा मोरे, सत्तार पटेल, शेखर देषमुख, प्रमोद कोल्हे, सर्जेराव पडघान, रवि पेटकर, जय बोंद्रे, शुभम कपसे, प्रविण कांबळे, अक्षय भराड, सागर साळवे, यष भालेराव, प्रसाद पवार, शेख जाकीर, दिनेष कोथलकर, प्रज्यवल शहाणे, रवि तायडे, यष माटे, कैलास जंगले, शेख बबलु, धनंजय देषमुख, चेतन इंगळे, राहुल भंडारे, अक्षय भंडारे, नयन जैवाल, यष पाटील, अजिम खान, बासिद जमदार, महेंद्र षिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील विविध सेल व विभागाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,नागरीक, महिलांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
Users Today : 33