महापालिका कर्मचाऱ्याच्या उद्योगाने अख्खं नागपूर हादरलं; लाखोंचा चुना लावून पसार, काय घडलं?

Khozmaster
1 Min Read

नागपूर : महापालिकेची १९ लाखांची रोख बँकेत जमा न करता ती घेऊन कर्मचारी पसार झाला. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी कर्मचाऱ्याविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. रोहित बेनीराम बोकडे (वय २९, रा. घोगली), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. रोहित हा रायटर बिझनेस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमीटेड कंपनीत एटीएम ऑपरेटर आहे.

काय घडलं?

त्रिमूर्तीनगर येथे कंपनीचे कार्यालय आहे. कंपनीतर्फे खासगी व राष्ट्रीयीकृत बँकेत विविध प्रतिष्ठान संस्थांकडून जमा केलेली रोख जमा करण्याचेही काम करण्यात येते. महापालिकेच्या लक्ष्मीनगर, मंगळवारी आणि नेहरूनगर झोनमधून रोख जमा करून ती बँकेत जमा करण्याचे काम रोहित याच्याकडे होते. त्याने या तिन्ही झोनमधून जमा केलेली एकूण १९ लाख ६ हजार ८२१ रुपयांची रोख बँकेत जमा न करता परस्पर लंपास केली. सुटी घेऊन तो पसार झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून रोहितचा शोध सुरू केला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *