प्रविण चव्हाण
नंदुरबार : जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. तथापि, माहे डिसेंबर महिन्यातील पहिल्या सोमवारी 4 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 01-00 वाजता जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, रंगावली सभागृह नंदुरबार येथे जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी न्यायप्रविष्ठ प्रकरणे वगळून तक्रार अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे उपस्थित राहून सादर करावेत, असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी खांदे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.