नंदनगरीतील कार्तिक स्वामी मंदिर दर्शनासाठी खुले होणार..

Khozmaster
1 Min Read
प्रविण चव्हाण
 
नंदुरबार (प्रतिनिधी) शहरातील सीबी गार्डन जवळील लाल बहादूर शास्त्री नगरातील कार्तिक स्वामी मंदिर भाविकांना रविवारी दर्शनासाठी खुले होणार आहे.माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते रविवार दि. 26 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजेला आरती होईल.
शहरातील लालबहादूर शास्त्री नगर परिसरात भूमी जलधारा शेजारी ओम शक्ती महादेव मंदिर असून या मंदिरात कार्तिक स्वामींचे छोटे मंदिर आहे.शहरातील वाघोदा रस्त्यावर कार्तिक स्वामी हे एकमेव मंदिर असून
भाविकांच्या मान्यतेनुसार वर्षातून फक्त एक दिवस दर्शनाचा योग येतो.
त्यानुसार यावर्षी रविवार दि. 26 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजे पासून ते सोमवार 27 नोव्हेंबर दुपारी दीड वाजेपर्यंत एक दिवसासाठी मंदिर बालकांसाठी खुले करण्यात येणार आहे.या महादेव मंदिर परिसरात शमीपत्र,रुचकीनधोत्रा आणि बेलया औषधी वनस्पती व महादेवाला पूजेला लागणाऱ्या वृक्षांची उपजत निर्मिती झाली आहे.भाविकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक प्रीतमकुमार सुरेश भोई यांच्यासह लाल बहादूर शास्त्री नगरातील नागरिकांनी केले आहे.
0 9 4 6 4 7
Users Today : 61
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *