प्रविण चव्हाण
नंदुरबार (प्रतिनिधी) शहरातील नळवा रस्त्यावरील कल्याणी पार्क येथे सुरू असलेल्या श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचा उद्या गुरुवार दि. 30 नोव्हेंबर रोजी समारोप होणार आहे.वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज कथेचे निरूपण करीत आहेत.
काल सायंकाळी प्रसिद्ध उद्योजक मनोज रघुवंशी आणि कविता रघुवंशी यांच्या हस्ते सपत्नीक आरती करण्यात आली.संगीतमय कथेत हार्मोनियमवर आनंद मराठे,तबला मुकेश पडोळे, बँजो शिवम राठोड तसेच पुरोहित राजेंद्र जोशी, विलास जोशी सहकार्य करीत आहेत.श्रीमद् भागवत कथा निमित्त भाविकांनी आज बुधवारी दुपारी दोन ते पाच या वेळेत कथा श्रवणासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन कथा आयोजक श्रीमती रमणबाई हरीसिंग गिरासे,पप्पू गिरासे, मनकुवर बाई गिरासे, चि. विपुल गिरासे, चि. प्रणव गिरासे व परिवाराने केले आहे. उद्या गुरुवार दि. 30 नोव्हेंबर रोजी दुपारी महाप्रसादाने कथेची सांगता होईल.भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन गिरासे परिवारातर्फे करण्यात आले आहे.
Users Today : 8