लोणार प्रतिनिधी :-
तालुक्यातील मौजे वेणी येथे काल भक्ती आणि संस्कारांनी भरलेल्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. माझ्या व श्री. निरज संजय रायमुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला ग्रामस्थ आणि भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमात ह.भ.प. शिवलीलाताई पाटील यांच्या सुमधुर आणि प्रभावी कीर्तनाचा लाभ उपस्थित भाविकांना झाला. त्यांच्या ओजस्वी प्रवचनाने संपूर्ण परिसर ‘विठ्ठल विठ्ठल’ च्या जयघोषाने दुमदुमून गेला. भक्ती, प्रबोधन आणि ज्ञानाने सजलेल्या या कीर्तनाने भाविकांना अध्यात्मिक उर्जा मिळाली.
या प्रसंगी माजी आमदार श्री. संजयजी रायमुलकर यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी संवाद साधत सामाजिक बांधिलकी व एकीचे महत्व अधोरेखित केले.
या भव्य भक्ती सोहळ्यामुळे मौजे वेणीमध्ये आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून उपस्थित भाविकांनी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.
Users Today : 18