शेटफळगढे, ता २ : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने रात्रपाळी केल्याने शेतामध्ये पाणी साचले आहे. सलग तीन दिवस रात्रीच्या वेळेस जोरदार पावसाची हजेरी लावली आहे.
ऐन पावसाळ्यात देखील अशा स्वरूपाचा पाऊस न झाल्याने शेतकरी हवालदील झाला होता. पावसाळा संपल्यानंतर मात्र अवकाळीने पावसाळा सुरू असल्यासारखे रात्रीच्या वेळेस धुवाधार बरसल्याने शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले आहे. फळबाग शेतकरी चिंतेत आहेत तर रब्बी हंगामातील पिकाला आलेली मका आणि ज्वारीची पिके ही अडचणीत सापडली आहेत. अनेक ठिकाणी पिकात पाणी साचले आहे. पश्चिम भागातील निरगुडे, लाकडी, शेटफळगढे, पिंपळे म्हसोबाचीवाडी, काझड, शिंदेवाडी, अकोले परिसरात सलग तीनही दिवस पाऊस झाला आहे.
इंदापूरच्या पश्चिम भागात तिसऱ्या दिवशीही पाऊस
0
6
2
5
7
8
Users Today : 214
Leave a comment