नागपूर.
समाजकल्याण विभागांतर्गत चालवण्यात येत असलेल्या शासकीय मुलींच्या वस्तीगृहात हिवाळी अधिवेशनात आलेल्या पुरुष कर्मचारी व अधिकारी यांना अधिवेशनात काळात मुक्कामासाठी काॅटेज उपलब्ध करून दिल्याबद्दल वस्तीगृहाच्या विद्यार्थीनी भयभीत झाल्या असून पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
नागपुरात दिनांक 7 डिसेंबर पासून विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे या करीता मंत्रालयातुन आलेल्या कर्मचारी व अधिकारी यांना समाजकल्याण विभागांतर्गत चालवण्यात येत असलेल्या दिक्षा भुमी जवळच्या बजाज नगर पोलीस स्टेशन जवळील वसंत नगर या मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहात निवासी ठेवण्यात आले आहे, एकीकडे समाज कल्याण विभाग वस्तीगृहातीली मुलींच्या सुरक्षेचा आव आणत असला तरी हा विभाग मुलींची किती काळजी घेतो हे या घटनेवरून निदर्शनास येते.
एकीकडे वस्तीगृहात मुलींना भेटण्यासाठी त्यांचे पालक जरी आले तरी त्यांना तेथे थांबता येत नाही किंवा त्यांना येथील स्वच्छता गृह सुध्दा वापरल्या दिले जात नाही मग हे बाहेरून आलेले संबंधित विभागाचे कर्मचारी, अधिकारी कुठलं स्वच्छता गृह वापरणार हा संशोधनाचा विषय आहे दुसरी बाब म्हणजे मुलींचे निवासी व पुरुष कर्मचारी अधिकारी यांना ठेवलेल्या इमारत मध्ये कुठेही अंतर्गत सुरक्षा भिंत नाही त्यामुळे येथे अनुचित घटना घडण्यास वाव आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी नागपूर शहर येथील पदाधिकारी आक्रमक झाले असून त्यांनी आज दिनांक ६ डिसेंबर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिक्षा भुमी येथे जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले व नंतर वसंत नगर येथील मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहात भेट देत संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारला, जर येथे निवासी ठेवलेले पुरुष कर्मचारी व अधिकारी यांना इतरत्र न हलवल्यास वंचित बहुजन आघाडी संबंधित मंत्र्यांचा घेराव करुन त्यांना या संदर्भात जाब विचारणार आहे किंवा या संदर्भात तिव्र आंदोलन करावे लागले तरी करु अशी चेतावणी नागपूर शहर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष रवी शेंडे, महिला आघाडीच्या नेत्या वनमाला उके, वंचित चे विदर्भ संयोजक राहुल वानखेडे,माया शेंडे व इतर पदाधिकारी यांनी दिला.
मागासवर्गीय वस्तीगृहाच्या मुली असुरक्षित! विद्यार्थ्यांनी भयभीत, पालक चिंताग्रस्त. मुलींच्या वस्तीगृहात पुरुष कर्मचारी व अधिकाऱ्यांची निवारा. वंचित बहुजन आघाडी आक्रमक.
Leave a comment