दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी, अकोला द्वारा संचालित श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिशन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथील एन. सी. सी. युनिट राष्ट्रीय छात्र सेनेचे च्या कॅडेट्स द्वारे ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023’ च्या अंतर्गत पौष्टिक तृणधान्य सेवन करून आजारापासून दूर राहा असे आवाहन महाविद्यालयातील परिसरातील लोकांना केले. या कार्यक्रमाचे आयोजन ११ महाराष्ट्र बटालियन अकोल्याचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सी. पी. भदोला, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. आर. डी. सिकची व एन. सी. सी. ऑफिसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांच्या मार्गदर्शनात केल्या गेले. बाजरीचे उत्पादन आणि वापर वाढविण्याच्या उद्देशाने, भारत सरकारच्या आदेशानुसार संयुक्त राष्ट्र, २०२३ हे आंतरराष्ट्रीय लष्करी वर्ष घोषित केले. ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, गहू, राई, सातू हे तृणधान्य शरीराला ऊर्जा पुरवतात. यासाठी विविध बाजरीच्या लागवडी आणि वापरास प्रोत्साहन देण्यासाठी, बाजरीचे महत्त्व, अन्न सुरक्षा आणि टिकाव सुनिश्चित करण्यासाठी तसेच जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून महाविद्यालयातील एन. सी. सी. कॅडेट्सने पुढाकार घेऊन महाविद्यालयातील परिसरात रॅलीचे आयोजन तथा प्रत्यक्ष किराणा दुकानावर जाऊन लोकांमध्ये जनजागृती केली.
याप्रसंगी एन. सी. सी. ऑफिसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांनी आपले मत मांडताना, तुडधान्य सेवन केल्यानंतर आजारापासून दूर राहता येते. तसेच मधुमेह व केलेस्टॉल सारख्या रोगाला आळा घालता येतो. बाजरीचे महत्त्व आणि पौष्टिक मूल्य समजावून सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन करण्यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स सिनीयर अंडर ऑफिसर ऋषिकेश पटेल, जूनियर अंडर ऑफिसर सागर वानखडे, कॉर्पोरल श्रीकांत वाडोकार, कॅडेट चेतन जगताप, कॅडेट रोहन साबे, कॅडेट प्रणव वानखडे, कॅडेट प्रणव इंगोले, कॅडेट हेमंत पिंपळे, कॅडेट सर्वेश धांडे, सार्जेंट स्वराज बोधडे, कॉर्पोरल आदित्य वाकोडे, कॅडेट यशवंत हरसूलकर, कॅडेट गुणवंत गुजर, कॅडेट समर्थ दुबे, कॅडेट रोहन मुरादे, कॅडेट प्रेम अहिर, कॅडेट नयन घुगे, जूनियर अंडर ऑफिसर वैष्णवी ढेमरे, सार्जेंट तनाया नाफडे, कॉर्पोरल नैना टोंगळे, कॅडेट साक्षी पांडे, कॅडेट पूर्वा देवघरे, कॅडेट सलोनी यादव, कॉर्पोरल धनश्री चव्हाण, कॅडेट लक्ष्मी सुळे, कॅडेट सिमरन इंगळे, कॅडेट साक्षी झटाले, कॅडेट नीतीक्षा पांडे, कॅडेट आर्या गंगाखेडकर, कॅडेट सारिका यादव, कॅडेट भूमि कशीद, कॅडेट हर्षा गायकवाड यांनी बरीच मेहनत घेतली.