सतिश मवाळ .राळेगण सिद्धी येथे थोर समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांचे हस्ते महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या समाज सेवकांचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था पुणे द्वारे संस्थेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सत्कार सोहळ्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव, मुख्य संरक्षक वनविभाग महाराष्ट्र राज्य श्री रंगनाथ नाईकडे,पोलीस सहाधिक्षक श्री संतोष गायके, मा. खासदार भाऊसाहेब वाघचौरे, संस्थांचे आंतरराष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष श्री देवा तांबे सर ,राष्ट्रीय निरीक्षक मेजर महेश सोनवणे, शांतीदूत परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयजी दुबे, समाजसेविका डॉ. अर्पणाताई खाडे ठाणे, राष्ट्रीय महिला महासचिव सौ करुणा गंगे इत्यादी मान्यवर सत्कार मंचावर उपस्थित होते.
मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील प्राचार्य डॉक्टर पंढरीनाथ शेळके हे चाळीस वर्षापासून शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक सेवा कार्यात सक्रिय आहे. दिव्यांग सेवा, व्यसनमुक्ती जनप्रबोधन ,राष्ट्रीय एकात्मता, कोरोना काळात कोरोनायोद्धा, सामूहिक विवाह सोहळा, राष्ट्रीय कार्याचा प्रसार, इत्यादी सेवा कार्यात आहेत. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून आंतरराष्ट्रीय संस्थेचे दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार २०२३ चा हा सन्मानाचा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण पद्मश्री आदरणीय श्री अण्णासाहेब हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या राळेगण सिद्धी येथे त्यांच्यासह वरील मान्यवरांचे असते प्रधान करण्यात आला.
प्राचार्य डॉ. पंढरीनाथ शेळके यांना यांचा जनसंपर्क महाराष्ट्रभर आहे. त्यांना मिळालेल्या राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार निमित्त त्यांचा सत्कार आणि अभिनंदन साहित्यिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मित्रपरिवारांनी त्यांचे अभिष्ट चिंतन, भेट घेऊन केले आहे.