जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता ११ व १२ वी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील विद्यार्थिनींची शैक्षणिक सहल दि.११ ते १७ डिसेंबर दरम्यान अमृतसर- आग्रा या ठिकाणी संपन्न होत आहे यासाठी आज सकाळी ७ वा.भुसावळ येथून अमृतसर एक्सप्रेसने सहल रवाना झाली.
भारतातील ऐतिहासिक पर्यटन स्थळ,भौगोलिक दृष्ट्या अभ्यास व्हावा या उद्देशाने शैक्षणिक सहलीच्या आयोजन करण्यात आले आहे, भारतातील अमृतसर येथील प्रसिद्ध सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग, अटारी वाघा बॉर्डर,आग्रा येथील ऐतिहासिक ताजमहल,आग्रा फोर्ट,भगवान श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा,ऐतिहासिक प्रेम मंदिर वृंदावन अश्या विविध ठिकाणी १२५ विद्यार्थिनी व १० शिक्षक या प्रेक्षणीय स्थळांना भेट देणार आहे.
मुख्याध्यापक एस.आर. चव्हाण,उपप्राचार्य प्रा.के एन मराठे,पर्यवेक्षक प्रा.के डी निमगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहल प्रमुख प्रा.विजय पाटील, ज्येष्ठ शिक्षक प्रा.जी जी अत्तरदे, प्रा.डी.झेड.गायकवाड, प्रा.आर. आर पाटील,प्रा.सविता महाजन, प्रा.माधुरी महाजन, प्रा.वैशाली पाटील, प्रा.राजश्री पाटील, प्रा.सचिन बावस्कर, क्रीडा शिक्षक प्रा.समीर घोडेस्वार सहलीसाठी परिश्रम घेत आहे.
—————————— ———-