वार साहेब .
पट्टीचे पोहणारे
सोडून गेले नाव
जाताना तळाला
घालून गेले घाव
वादळी झंझावात
दूर राहिले गाव
उंदरांनी लगेचचं
बाहेर घेतली धाव
उरलेले नव शिके
रे अनुभव अभाव
पाणी पण पेटलेले
चाचे करती उठाव
म्हातारा नावाडी
त्याला असे सराव
शिताफीनं एकटा
सावरे सारा डाव
हिमतीने नेई कशी
किना-याला नाव
स्वागतां नावाड्या
लोटला अवघे गांव
अंगा उर्जा सळाळे
पवार साहेब नाव
असे रत्न महाराष्ट्री
वधारेआपला भाव
एक्झिट घेऊ पाही
अचानक घाले घाव
राजीनामानिर्णयाने
मनाचा घेतला ठाव