भारत सरकाचे शिक्षण मंत्रालय, राज्य शासन, पुणे महापालिका आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे पुस्तक महोत्सवाला भेट दिली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रकाशक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मुख्य संयोजक श्री राजेश पांडे, न्यासाचे अध्यक्ष श्री मिलिंद मराठे यांनी अत्यंत सुरेख पद्धतीने केले आहे. या महोत्सवात तीन पुस्तकांनी माझे विशेष लक्ष आकर्षित केले. एक म्हणजे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाची मूळ प्रत, याशिवाय डॉ. गिरीश दाबके यांचे ‘नरेंद्रपर्व’ यापैकी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाच्या मूळ प्रतीचे दर्शन होणे माझ्यासाठी भाग्याचे होते. यावेळी माझ्या समवेत खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष सचिन मोरे, मा. उपसरपंच नऱ्हे सुशांत कुटे उपस्थित होते