पुढील महिन्यात दि. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथे श्री प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार असुन त्या निमित्ताने गेली ७०० वर्ष चाललेल्या संघर्षाला अंतिम स्वरूप प्राप्त होत आहे. प्रभु रामचंद्रांचे मंदिर निर्माण हे राष्ट्र निर्माणाचे प्रतीक व्हावे म्हणुन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास यांनी संपुर्ण भारतातील १०० कोटी जनतेला अयोध्याला दर्शनाला येण्याचे निमंत्रण अक्षता रुपी पाठवायचे आहे.
याकरिता सांगलीत मारुती चौक येथून श्री प्रभू रामचंद्राच्या अयोध्येतील कार्यक्रमाच्या मंगलअक्षता, कलश पूजन शोभायात्रेची सुरुवात झाली. याप्रसंगी सांगलीत श्री राम मंदिर येथे कलश वहनाचे भाग्य मला लाभले. याप्रसंगी परमपूज्य श्री कोटणीस महाराज व मंदिर ट्रस्टींच्या समवेत आरती करीत उपस्थित भाविकांना शुभेच्छा दिल्या.