देशभरात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. सत्ताधारी भाजपसह सर्वच विरोधी पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भारतीय जनता पक्षाने ४० पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट ठेवून कामाला सुरुवात केली आहे. यामध्ये दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या झालेला पुणे मतदारसंघावर भाजपने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे भाजपचा चेहरा कोण? भाजपकडून लोकसभेचा उमेदवार कोण असणार यावर पक्षांतर्गत मोठी खलबत सुरू आहेत. पुणे लोकसभा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी भाजप तर्फे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील देवधर यांची नावे चर्चेत आहेत. या तिन्ही इच्छुक उमेदवारांकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.सुरुवातीला जगदीश मुळीक यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या कथेच्या आयोजनातून आपला जनसंपर्क वाढवत मोठे शक्तिप्रदर्शन केले. त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या संस्कृती प्रतिष्ठानतर्फे अटल संस्कृती पुरस्कार देत मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. यानंतर आता सुनील देवधर यांनी देखील शहरात पुढील दोन महिन्यात मोठ्या कार्यक्रमांचा आयोजन करत आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत.सुनील देवधर यांनी काल पुण्यात एक बैठक घेतली या बैठकीमध्ये भाजपचे जुने कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पुण्यात येत्या दोन महिन्यात तीन मोठ्या कार्यक्रमाद्वारे करणार सुनील देवधर शक्तीप्रदर्शन करणार आहेत. यामध्ये लता मंगेशकर पुरस्कार, राजमाता जिजाऊ जयंती उत्सव आणि मकर संक्रांतीचा कार्यक्रम करून शक्तीप्रदर्शन करणार असल्याने त्यादृष्टीने बैठकीत नियोजन करण्यात आले.सुनील देवधर यांनी काल रात्री उशिरा घेतलेल्या या बैठकीचे सुनील देवधर मित्रमंडळच्या नावाने निमंत्रण देण्यात आले होते. प्रामुख्याने भाजपपासून दुरावलेला मतदार जवळ करण्यासाठी ही बैठक देवधर यांनी बोलवली असल्याची माहिती आहे. या बैठकीला जुने भाजपाई उपस्थित असल्याने देवधर यांनी आपल्या पातळीवर आता मोर्चेबांधणीला सुरुवात केली असल्याची चर्चा शहरभर रंगली आहे.