नवीन हाॅटेल दिसे
बदलतो कसा मूड
खाणे अति आवडे
प्रियतम फास्टफूड
चाखून पाहतो चव
आहोत भलते शृढ
मित्र मंडळी चिडवे
खाण्या राॅबीन हूड
पचवी मिळेल ते ते
शरीराचे झाले धूड
भरल्या पोटा वरती
खाऊन उगवी सूड
सगळे पचते कसे रे
सगळ्या पडते गूढ
आमचेमुळेचं झाला
खवय्या शब्द रूढ
खातअसता आम्ही
नकात करु लुडबूड
सतत शोधतो खाद्य
स्थीर ना राहते बूड
पंगतीतशोभून दिसे
होणारं आसनारूढ
तुम्ही चिल्लर पक्षी
आम्ही मोठाले गरुड
दोन दिवसात नवीन
कपडे लगेचं आखूड
हेल्थकाॅंशस असावे
वाजवूनकात भारुड
– हेमंत मुसरीफ पुणे .
9730306996…
सर नमस्कार
कविता प्रस्तुत कृपया प्रकाशित करावीं ही विनंती