सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत .सोयगाव तालुक्यातील सावळदबारा परिसरात सोयगाव मंडळा मधे सध्या थंडी पडत असल्याने रब्बी पिकांतील गहु हरभरा पिकांची वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे, येथे व सावळदबारा परिसरात गत महिन्याभरा पासून ढगाळ वातावरण ओली धुई तथा अवकाळी मुसळधार पावसाचे विचित्र चक्र सुरू आहे. तर २५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत अवकाळी पावसाने लावून धरले होते. तर तद्नंतर ओली धुई व ढगाळ वातावरण बदलते हवामान बघता रब्बी पिकांतील गहु हरभरा पिकात वाढ होत नव्हती. तर अवकाळी पावसामुळे दुबारात गहु हरभरा ची पेरा करावा लागला. पण ना ना म्हणत हळुवारपणे गारठा व थंडीचे आगमान झाले असुण गहू हरभरा पिकांची वाढ होतांना दिसत आहे. व जबरदस्त पिकें बहरलेली दिसून येत आहे.