पालघर : सौरभ कामडी .मोखाडा तालुका अंतर्गत येणाऱ्या शैक्षणिक तालुक्यातून प्रथम व द्वितीय क्रमांक आलेल्या स्पर्धकांमध्ये विविध्द गुनदर्शन स्पर्धा कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय साखरी येथे पार पडल्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मोखाडा पंचायत समिती सभापती भास्कर ठेतले उपसभापती प्रदिपजी वाघ उपस्थित होते. समूहगीत लहान मोठा गट,भाषण,वादविवाद,आणि नाट्य अशा पाच प्रकारात पार पडलेल्या स्पर्धेत कोचाळे शाळेतील निखिल झुगरे याचा लहान गटात माझ्या स्वप्नातील पालघर जिल्हा या विषयावर सादर केलेल्या भाषणास द्वितीय क्रमांक मिळाला तर लहान गटातील समुहगाणास प्रथम क्रमांक मिळाला , कोचा ळे शाळेने सादर केलेल्या स्वच्छ सुंदर पालघर जिल्हा या विषयावरील नाटकास प्रथम क्रमांक मिळाला एकूण पाच प्रकारात पार पडलेल्या स्पर्धेत कोचाळे शाळेने तीन प्रकारात क्रमांक मिळवून यश संपादन केले .तालुकास्तरावरील प्रथम क्रमांक आलेले विद्यार्थी व संघ जिल्हास्तरावर सहभागी होतील संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण कारेगाव आश्रम शाळेचे ललित आहीरे.हिरवे पिंपळपाडा आश्रम शाळेचे नंदन सर व क.भा.प. हायस्कूलचे सोगिर यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक दिनकर फसाळे शिक्षक गणेश सुरेश वाघ राजाराम जोशी व दिनेश ठोमरे यांनी केले.बक्षीस वितरण प्रसंगी मोखाडा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी वसंत महाले साहेब केंद्रप्रमुख नागू वीरकर व सर्व केंद्राचे केंद्रप्रमुख बी आर सी स्टाफ उपस्थित होते .