देशाच्या स्वातंत्र्यासाठी शीख समाजातील अनेकांनी हौतात्म्य पत्करले. गुरु गोविंदसिंगजी यांचे पुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंह व बाबा फतेह सिंह यांचे मात्र बलिदान अनन्यसाधारण होते. त्यांच्या हौतात्म्याचा आदर्श ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी त्यांच्या बलिदानाचे स्मरण केले. इतिहासाला गौरवास्पद वाटावे, अशा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान प्रत्येकाने करावा,असे आवाहन सांगली टिंबर एरिया येथील गुरुव्दारात आयोजित कार्यक्रमात केले . गुरुद्वारा आश्रमचे अध्यक्ष भूपेंद्रसिंग यांनी वीर बाल दिनानिमित्त शहीद झालेल्या बालवीरांच्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी दातार सिंग, जसविंदर सिंग, परमजीत सिंग, हरपाल सिंग, बलजींद्र सिंग, मंजीत सिंग, संजय सिंग, भाजप महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे, माजी नगरसेविका अनारकली कुरणे, माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, महिला मोर्चा सरचिटणीस गीता पवार, भाजप कोषाध्यक्ष धनेश कातगडे, रवींद्र ढगे, प्रियानंद कांबळे, सूरज पवार, अर्जुन मजले, चेतन भोसले यांच्यासह पदाधिकारी व शीख समाजातील मान्यवर उपस्थित होते…