बीड : नुकत्याच दि. २१ तथा २२ डिसेंबर, २०२३ रोजी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील एकता फाऊंडेशन, शिरूर कासारच्या वतीने मौजे गोमळवाडा येथे ज्येष्ठ साहित्यिक कथाकार मा.भास्कर बढे यांच्या अध्यक्षतेखाली तथा स्वागताध्यक्ष मा.आजीनाथ गवळी, उदघाटक सुप्रसिद्ध साहित्यिक मा.बाबा भांड – छ. संभाजीनगर, श्री. ह. भ. प. महंत भानुदास महाराज शास्त्री तथा महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आवर्जून उपस्थित असलेल्या दिग्गज साहित्यिक-
लेखक-कवी-कथाकार-वक्ते-
संपादक-पत्रकार-कलावंत तथा शैक्षणिक-सामाजिक-राजकीय अशा बहुतांश क्षेत्रातील विद्वत्जनांच्या च्या प्रमुख उपस्थितीत परिसरातील विविध शाळांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसह शिक्षक-साहित्यिक-नागरिकांंनी काढलेल्या ग्रंथदिंडीने सुरुवात होऊन पार पडलेल्या या सर्वार्थसंपन्न ६ व्या द्विदिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनात उदघाटन समारंभात आयोजकांचे प्रास्ताविक-मान्यवरांचा सत्कार- त्यांची भाषणे-विविध क्षेत्रातील लेखक-कवी-साहित्यिकांना पुरस्कार वितरण सोहळ्यासह व्यंगचित्र प्रदर्शन-पुस्तक प्रकाशन-ग्रामीण जीवन समस्या-त्यांची जबाबदारी व निराकरण इ. वरील अभ्यासू पत्रकार तथा अध्ययनशील मंडळींचे परिसंवादामधून नकोशी मानसिकतेसह सर्वंकष मार्गदर्शन-कथाकथन-सांस्कृतिक कार्यक्रम-शास्त्रीय गायन तथा राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कवी-कवयित्रींच्या मानवी जीवन-मानसिकता-
महिलांच्या समस्या तथा भावविश्व-श्रध्दा-समर्पण-
शेतीप्रधान देशातील शेतकरी व्यथा-होरपळ-दोलायमान वैचारिकता-प्रबोधन इ. निगडीत विषयावरील सुमधूर काव्यगायन अशा विविधांगी कार्यक्रमांचे आविष्करण असलेल्या या संमेलनात मा. बाबा भांड, मा. प्रा. डॉ. भास्कर बडे, परिसंवादातील अनुभवी पत्रकार-संपादक मंडळी तथा महिला किसान अधिकार मंचच्या मा. मनिषा तोकले, राजर्षी छत्रपती शाहू मंडळाचे अध्यक्ष मा.तत्वशील कांबळे,बाल कल्याण चे अध्यक्ष अशोक तांगडे, मा.प्रा.सुशीला मोराळे इ. नी आपल्या वक्तृत्वातून प्रेक्षक-नागरिकांवर आपल्या प्रबोधनपर आवाहनाने तर प्रभावी छाप पाडलीच पण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संमोहनसिध्द कथाकथनासाठी निमंत्रित ख्यातनाम कथाकार कवी डॉ.बबनराव महामुने यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्ह्यातील ज्येष्ठ कवी डॉ. डी. व्ही. खरात, कलावंत कवी भारत साबळे, भावकवी अंकुश पडघान यांच्या टाळ्या मिळविणाऱ्या कवितांसोबतंच महाराष्ट्रासह गोवा-गुजरात-दिल्ली-कर्नाटक- आंध्र-तेलंगणा-तामिळनाडू-चेन्नई
-पांडेचेरी अशा विविध राज्यात साहित्य रसिकांच्या विश्वात सातत्याने गाजत असलेल्या ‘ त्या तरूच्या सावलीला….. ‘ या डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली यांच्या भावपूर्ण कवितेने
आबालवृध्दांसह साऱ्या समारंभाचा माहौलंच बदलून टाकून सर्व साहित्यिक-रसिक-
प्रेक्षक-नागरिकांना मंत्रमुग्ध
केले. या संमेलनात ज्येष्ठ शाहीर कवी अनिल तिवारी, गोकूळ पवार, देवीदास शिंदे, संभाजी काळे, शैला जगदंबे, अर्चना डावखर-शिंदे, रचना तथा बाल कवयित्री कु. ऋतुजा मुंढे इ. बऱ्याच कवी कवयित्री यांनी आपल्या काव्याविष्काराने वातावरण भारावून टाकले.