स्व. पुष्पादेवी पाटील महाविद्यालयाचे विद्यापीठ स्तरीय अविष्कार स्पर्धेत देदीप्यमान यश..!!

Khozmaster
4 Min Read
दिपक मापारी @ दै.खोजमास्टर वाशिम :–  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत घेण्यात येणाऱ्या अतिशय प्रतिष्ठेच्या व मानाच्या समजल्या जाणाऱ्या विद्यापीठस्तरीय आविष्कार 2023-24 या स्पर्धेत स्व. पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय रिसोड यांनी या स्पर्धेत उंच भरारी घेत मोठे यश संपादन प्राप्त केले आहे. या स्पर्धेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एन. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे अविष्कार समन्वयक  डॉ.अमोल अढाव व प्रा. देशमुख मॅडम यांच्या नेतृत्वाखाली संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती येथे दिनांक 26 व 27 डिसेंबर 2023 ला अविष्कार स्पर्धेत एकूण जिल्हास्तरीय मधून प्राविण्य प्राप्त झालेले महाविद्यालयाचे 7 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत महाविद्यालयाला पदवी गटातून संपूर्ण विद्यापीठातून एग्रीकल्चर या कॅटेगिरी मधून महाविद्यालयाच्या कु. श्वेता पावडे व कु. गायत्री ढोले यांना अनुक्रमे द्वितीय क्रमांक प्राप्त झाला यामुळे त्यांना कलर कोट सुद्धा प्राप्त झाला आहे. महाविद्यालयाच्या इतिहासामध्ये अविष्कार स्पर्धेत प्रथमच कलर कोट प्राप्त झाला आहे हे विशेष. या दोन्ही विद्यार्थ्यांना सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. अमोल अढाव व प्रा. खडसे यांनी गाईड म्हणून या नाविन्यपूर्ण संशोधनासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले होते. ही स्पर्धा जिल्हास्तरीय, विद्यापीठस्तरीय, राज्य व देश पातळीवर अशा विविध टप्प्यांमध्ये घेतली जात असते त्या अनुषंगाने महाविद्यालयाच्या अविष्कार चमूनी उत्तुंग भरारी घेत प्रथम जिल्हास्तरीय व विद्यापीठस्तरीय स्तरावर 400 महाविद्यालयातून दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे. त्यामुळे महाविद्यालयाचे नाव या परिसरामध्ये नावलौकिक झाले आहे. निश्चितच येणाऱ्या काळात या महाविद्यालयाला उज्वल भविष्य आहे  असे मत याप्रसंगी विद्यापीठ समारोपीय कार्यक्रमात विद्यापीठात मान्यवरांनी संबोधले.  या दोन्ही विद्यार्थ्यांनी वापरलेल्या चहाच्या पत्तीचे विविध कसे उपयोग आपण करू शकतो या संशोधनावर नवीन संशोधन करून नावीन्यपूर्ण संशोधन पोस्टर व पीपीटी प्रेझेंटेशन द्वारे सतत दोन दिवस परीक्षकांना प्रस्तुत केले  होते. त्याचेच यश म्हणून या दोन्ही विद्यार्थ्यांना विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धेत कलर कोट प्राप्त झाला आहे . या स्पर्धेत कु. अंकिता महाजन, कु. स्नेहा सरकटे, कु. नूर शाह, कु. दिव्या गोल्हारे व शैलेश इंगळे यांनी सुद्धा सहभाग नोंदविला होता. ही स्पर्धा राज्य व देश पातळीवर नाविन्यपूर्ण संशोधन यासाठी प्रतिष्ठितली मानली जाते. देशात नवीन संशोधन समाज उपयोगी पडावे या उदात्त हेतूने नाविन्यपूर्ण संशोधनाला उत्तेजना देण्यासाठी ही स्पर्धा राज्य व देश पातळीवर सुद्धा आयोजित केली जात असते. त्या अनुषंगाने महाविद्यालयाचे विद्यार्थी कु. श्वेता पावडे व कु.गायत्री ढोले हे नाशिक येथे दिनांक 12 जानेवारी ते 16  जानेवारी 2024 दरम्यान राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेत आपले  नाविन्यपूर्ण संशोधन प्रस्तुत करणार आहेत.  या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाबाराव पाटील खडसे साहेब यांनी आपले महाविद्यालय ग्रामीण भागात असून ग्रामीण शेतकरी व कष्टकऱ्यांची मुले या संस्थेत शिक्षण घेत असतात व त्यांना चांगल्या पद्धतीने आपल्याला  विद्यार्थ्यांना शिकवून उच्चपदापर्यंत पोहोचावे असे मत व्यक्त केले. संस्थेचे सचिव यांनी अशा प्रकारचे प्राविण्य प्राप्त करून आपल्या आपले,महाविद्यालयाचे व आपल्या परिसराचे नाव उज्वल करावे असे मत व्यक्त केले. संस्थेचे कार्यकारी अधिकारी डॉ. जे बी देव्हडे यांनी सांगितले की आपले महाविद्यालय हे दिवसेंदिवस प्रगती च्या शिखरावर पोहोचत आहे यासाठी सर्वांचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम एन.गायकवाड यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी  सातत्यपूर्ण पाठपुरावा करून या यशामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या सर्व विद्यार्थ्यांचे संपूर्ण विद्यापीठातून कौतुक होत असून समोरच्या राज्यस्तराय अविष्कार स्पर्धेसाठी सर्वांनी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या स्पर्धेसाठी महाविद्यालयाच्या वतीने डॉ.आदिनाथ बदर यांचे मोलाचे सहकार्य  मिळाले.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *